रुद्रपूर (उत्तराखंड) Looteri Dulhan Hiv Positive : एकीकडं मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसतानाच विवाहाचं निमित्त करून फसविणाऱ्या तरुणीची घटना समोर आलीय. उधमसिंह नगर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आलीय. अनेक जणांची फसवणूक करणारी 'लुटेरी दुल्हन' एचआयव्ही पॉझिटिव्ह निघाली आहे. तिच्या संपर्कात आलेल्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. ही महिला सध्या यूपीच्या तुरुंगात बंद आहे. महिला एचआयव्ही पॉझिटिव्ह असल्याचं समोर आल्यानंतर आरोग्य विभागानं संबंधित जिल्ह्याच्या आरोग्य विभागाच्या पथकाशी संपर्क साधला.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोग्य विभागाचे पथक यूपीच्या वैद्यकीय पथकाशी संपर्क साधून महिलेवर उपचार करत आहेत. या महिलेच्या संपर्कात आलेल्या काही जणांवर आरोग्य विभागाचे पथक उपचार करत आहे. यासंदर्भात अधिक माहिती देत एड्स नियंत्रण कार्यक्रमाचे नोडल अधिकारी आणि डॉ. राजेश आर्य म्हणाले की, "काही काळापूर्वी भारत सरकारच्या सूचनेवरून आरोग्य विभागाकडून निर्देशांक चाचणी मोहीम राबविण्यात आली होती. तसंच, यापूर्वी जे उपचार घेत नव्हते, असा एचआयव्ही बाधित रुग्णांची यादी गोळा करण्यात आली होती. या यादीत या महिलेच्या नावाचाही समावेश होता.
आरोग्य विभागानं यूपीच्या डॉक्टरांशी संपर्क साधून या प्रकरणाची माहिती दिली. त्यानंतर महिलेवर उपचार सुरू केले. त्यांनी सांगितलं की, आरोग्य विभागाच्या टीमनं महिलेशी संपर्क साधला होता. काही काळानं महिलेनं आपला फोन बंद केला. त्यानंतर ती गायब झाली. काही महिन्यांपूर्वी ही महिला उत्तर प्रदेशातील एका व्यक्तीसोबत फसवणूक केल्याप्रकरणी यूपीच्या तुरुंगात शिक्षा भोगत होती. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेनं तिच्या काही साथीदारांसह तीनहून अधिक लोकांबरोबर करून लुटलं होतं. अशा परिस्थितीत आरोग्य विभागाच्या पथकानं महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांनी आरोग्य तपासणी करण्याचं आवाहन केलंय. डॉक्टर राजेश आर्य यांनी सांगितलं की, " महिलेच्या संपर्कात आलेल्या लोकांची तपासणी केली जात आहे. याशिवाय वैद्यकीय पथक कारागृहात महिलेवर उपचार करत आहे.
हेही वाचा -
- व्यक्तीच्या निधनानंतरही पालकांनी दिली लग्नासाठी जाहीरात, वाचा काय आहे प्रकरण - Ghost Groom For Dead Bride
- लेकानं पुरवला अनोखा हट्ट; 80 वर्षीय बापाचं दिलं थेट लग्नच लावून, वरातीत बाप-लेक-नातवंड 'झिंगाट' - Marriage Ceremony Amravati
- उच्चशिक्षित तरुणीनं स्वतःच्या लग्नाचं वऱ्हाड नेलं बैलगाडीतून, गावाची खंडित परंपरा केली सुरू - bride carry bullock cart