ETV Bharat / bharat

फोन चोरीला गेल्यानंतर बँक खाते होऊ शकते रिकामे, 'ही' एक गोष्ट करा पैसे राहतील सुरक्षित - UPI news - UPI NEWS

UPI news तुमचा फोन चोरीला गेल्यास आता घाबरण्याची गरज नाही. कारण तुम्ही घर बसल्या बँकिंग तपशील किंवा UPI आयडीचा गैरवापर थांबवू शकता. यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. चला तर जाणून घेऊया, काही महत्वपूर्ण स्टेप्स.

UPI news
युपीआय आयडी ब्लॉक कसा करावा (Getty Images)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 29, 2024, 10:29 AM IST

हैदराबाद UPI News : आज प्रत्येकाच्या हातात असलेला स्मार्टफोन दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक होत चालला आहे. आज आपला वैयक्तिक सर्व डेटा या फोनमध्ये स्टोअर केला जातो. अशात अचानक आपला फोन चोरीला गेला तर? त्यातील डेटा आणि विशिष्ट माहितीचा गैरवापर होण्याची दाट शक्यता असते.

आपला फोन चोरीला गेला तर सर्वात महत्वाचे म्हणजे पैसे ट्रान्सफर करणाऱ्या ॲप्लीकेशनमुळे फोन बँक खात्याची माहिती लिक होण्याचा धोका जास्त असतो. तसंच, यूपीआय आयडीचाही गैरवापर होऊ शकतो. अशा परिस्थितीत आता घाबरण्याची गरज नाही. काही गोष्टींची काळजी केली तर तुम्ही ते ॲप्लिकेशन आणि यूपीआय आयडी ब्लॅाक करू शकता.

UPI आयडी कसे बंद करावे: यासाठी सर्वप्रथम तुम्हाला 02268727374 किंवा 08068727374 या क्रमांकावर कॉल करावा लागेल. आपल्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर तक्रार नोंदवा. त्यानंतर ओटीपी नंबर मागितला जाईल. सिम कार्ड आणि डिव्हाइस हरवण्याचा पर्याय तुम्हाला निवडावा लागेल. त्यानंतर तुम्ही कस्टमर केअरशी कनेक्ट व्हाल. येथे तुम्ही तुमचा फोन चोरीला गेल्याची माहिती देऊन UPI आयडी ब्लॉक करू शकता.

  • PhonePe ॲपचा आयडी कसा ब्लॉक करावा-जर तुम्ही ऑनलाइन पेमेंटसाठी PhonePe ॲप वापरत असाल तर PhonePe वर UPI आयडी ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला कंपनीच्या कस्टमर केअर नंबर - 0806-8727-374 किंवा 0226-8727-374 वर कॉल करावा लागेल. कॉल केल्यानंतर तुम्हाला कस्टमर केअर ऑफिसर काही माहिती विचारेल. तुम्ही दिलेल्या तपशीलाची पडताळणी केल्यानंतर ऑफिसर PhonePe तुमचा UPI आयडी ब्लॉक करेल.
  • पेटीएमवर UPI आयडी कसा ब्लॉक करायचा : तुम्ही पेटीएम ॲप वापरत असाल, तर तुमचा UPI आयडी ब्लॉक करण्यासाठी तुम्हाला हेल्पलाइन नंबर 01204456456 वर कॉल करावा लागेल. माहितीची पडताळणी केल्यानंतर, तुमचा UPI आयडी कंपनी तात्पुरता ब्लॉक करेल.
  • Google Pay वर UPI आयडी ब्लॉक करण्याच्या स्टेप्स: तुम्ही जर Google Pay वापरत असाल, तर तुम्हाला कंपनीच्या ग्राहक सेवा क्रमांक 18004190157 वर कॉल करून सर्व तपशील द्यावा लागेल. तपशीलांची पडताळणी केल्यानंतर, ग्राहक सेवा अधिकारी तुमचा UPI आयडी Google Pay वर ब्लॉक करेल.

हेही वाचा

  1. फोन पे कंपनीला 4 कोटींचा चुना, सायबर पोलिसांकडून दोघांना अटक - fraud with PhonePe company
  2. Phone Pay : महाराष्ट्राला पुन्हा धक्का; आता 'फोन पे' चे कार्यालयही मुंबईतून 'या' राज्यात जाणार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.