ETV Bharat / bharat

दरोडा टाकलेल्या घरात थंडगार एसीच्या हवेत झोपलेल्या चोराला पोलिसांच्या दांडक्यानंच आली जाग, वाचा पुढे काय घडलं? - thief in Lucknow

Unique thief in Lucknow : डॉक्टरच्या घरात चोरट्यानं चोरी करण्यासाठी प्रवेश केला. मात्र, चोरी सोडून तिथं तो झोपी गेला. पोलिसांच्या दांडक्यानंच त्याची झोप उडाली. वाचा रविवारी लखनौमध्ये नेमकं काय घडलं...

थंडगार वाऱ्याची झुळूक आल्यानं चोर गाढ झोपी गेला
थंडगार वाऱ्याची झुळूक आल्यानं चोर गाढ झोपी गेला (Etv Bharat UP Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 1:31 PM IST

Updated : Jun 3, 2024, 3:23 PM IST

लखनौ Unique thief in Lucknow : चोरीची अशी घटना तुम्ही क्वचितच ऐकली किंवा वाचली असेल. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमध्ये रविवारी एका चोरट्यानं डॉक्टरांच्या घरात चोरीच्या उद्देशानं प्रवेश केला. लखनऊमध्ये उकाडा प्रचंड असल्यानं चोरालाही थोडा आराम करण्याचा मोह आवरला नाही. त्यानं एसी चालू करुन आराम केला. थंडगार वाऱ्याची झुळूक आल्यानं चोर गाढ झोपी गेला. डोळे उघडल्यानंतर त्याला थेट समोर पोलीस दिसले. पोलिसांनी त्याची लॉकअपमध्ये रवानगी केली. हे प्रकरण लखनऊच्या गाझीपूर पोलीस ठाण्यांतर्गत इंदिरानगरमध्ये घडलंय. सध्या या प्रकरणाची परिसरात चांगलीच चर्चा आहे.

नेमकं काय घडलं : याविषयी अधिक माहिती अशी की, डॉ. सुनील पांडे यांचं इंदिरानगर येथील सेक्टर 20 मध्ये घर आहे. ते शहरातील दुसऱ्या घरी राहात असल्यानं अनेकदा हे घर बंद असतं. रविवारी सकाळी अचानक डॉक्टरांना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या व्यक्तींनी घर उघडे असल्याचा फोन केला. काहीतरी घडल्याचा अंदाज करत डॉक्टर हे इंदिरानगर येथील दुसऱ्या घरी पोहोचले. त्यांच्या ड्रॉईंग रूममध्ये एक व्यक्ती डाराडूर झोपलेली दिसली. त्याच्या बाजूला मोटार, गिझर, इन्व्हर्टर बॅटरीसह अनेक वस्तू पडलेल्या पाहून डॉक्टरांना धक्काच बसला. हा सर्व प्रकार बघून डॉक्टरांनी लगेच पोलिसांना बोलाविलं.

चोराची कारागृहात रवानगी : पोलिसांनी घरी आल्यानंतर चोराला झोपेतून उठवलं. त्यानं पोलिसांना त्याचं कपिल नाव असून गाझीपूरच्या समोधीपूरमध्ये राहणारा असल्याचं सांगितलं. शनिवारी रात्री दारुच्या नशेत चोरीसाठी डॉक्टरांच्या घरात घुसला होता. जास्त उकाडा होत असल्यानं एसी चालू करून झोपी गेला. गाझीपूरचे पोलीस निरीक्षक विकास राय यांनी सांगितलं की, "आरोपी हा एका गँगचा सदस्य आहे. त्यानं या भागात अनेक चोऱ्या केल्या आहेत." सध्या त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

हेही वाचा :

  1. पाणी चोरावर सेन्सर असलेले सीसीटीव्ही ठेवणार नजर, भीषण पाणीटंचाईत शेतकऱ्यानं लढविली शक्कल - water scarcity problem
  2. कोरोना सेफ्टी सूट घालून चोरट्यांनी लॉकरमधले 222 लोकांचे 5 कोटींचे दागिने लांबवले, पोलिसांनी कुणावर व्यक्त केला संशय? - Nashik crime
  3. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या खात्यातून लाखो रुपयांची चोरी, बँक खाते पश्चिम बंगाल आणि चेन्नईतील असल्याची माहिती समोर - Education Department

Last Updated : Jun 3, 2024, 3:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.