ETV Bharat / bharat

अर्थमंत्री निर्मला सीतारामन सातव्यांदा मांडणार देशाचा अर्थसंकल्प; मोरारजी देसाईंना टाकतील मागे - Union Budget 2024 - UNION BUDGET 2024

Union Budget 2024 : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी ही माहिती दिली.

Union Budget 2024
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 6, 2024, 8:04 PM IST

नवी दिल्ली Union Budget 2024 : देशात 18 व्या लोकसभेच्या स्थापनेनंतर आता मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळातील पहिला अर्थसंकल्प सादर करणार आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 2024 च्या तारखाही जाहीर झाल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन 23 जुलै रोजी संसदेत अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

किरेन रिजिजू यांची माहिती : 18व्या लोकसभेचं पहिलं अधिवेशन संपलं आहे. यात नवनिर्वाचित खासदारांचा शपथविधी सोहळा पार पडला आणि लोकसभा आणि राज्यसभेची संयुक्त बैठक झाली, ज्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी संबोधित केलं. आता सर्वांचं लक्ष अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडं लागलं आहे. संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 22 जुलै ते 12 ऑगस्टपर्यंत चालणार आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी त्यांच्या सोशल मीडियावर अर्थसंकल्पीय अधिवेशनाची माहिती दिली. "भारत सरकारच्या सूचनेनुसार, राष्ट्रपतींनी संसदेच्या दोन्ही सभागृहात 22 जुलै ते 12 ऑगस्ट या कालावधीत अर्थसंकल्पीय अधिवेशन घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय अर्थसंकल्प 23 जुलै 2024 रोजी लोकसभेत सादर केला जाईल." असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.

निर्मला सीतारामन यांच्या नावावर होणार अनोख्या विक्रमाची नोंद : या वर्षी दोनदा अर्थसंकल्प सादर केला जात आहे. 1 फेब्रुवारी 2024 रोजी अंतरिम अर्थसंकल्प सादर करण्यात आला. मात्र आता नवं सरकार स्थापन झाल्यानंतर संपूर्ण केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार आहे. यावेळी अर्थसंकल्प सादर होताच विद्यमान केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नावावर एक अनोखा विक्रम नोंदवला जाणार आहे. कारण, असं केल्यानं सलग सात केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या अर्थमंत्री ठरतील. या बाबतीत त्या मोरारजी देसाईंना मागं टाकतील. देसाई यांनी सलग सहा अर्थसंकल्प सादर केले होते.

मोदी 3.0 चा पहिला अर्थसंकल्प : भारतात ज्या वर्षी लोकसभेच्या निवडणुका होतात त्या वर्षी एक अर्थसंकल्प निवडणुकीपूर्वी आणि एक अर्थसंकल्प निवडणुकीनंतर सादर केला जातो. निवडणुकीपूर्वी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाला अंतरिम अर्थसंकल्प म्हणतात. त्यात सामान्यतः सरकारचं उत्पन्न आणि खर्च यांचा लेखाजोखा असतो. 23 जुलै रोजी होणारा सर्वसाधारण अर्थसंकल्प मोदी 3.0 चा पहिला अर्थसंकल्प असेल. याद्वारे सरकारची दिशा आणि धोरणांची माहिती मिळणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधीच जाहीर केलं आहे की, पुढील पाच वर्षे गरिबीविरुद्ध लढण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असतील.

हेही वाचा :

  1. मागील दहा वर्षात अर्थव्यवस्थेत सकारात्मक बदल; 2047 पर्यंत भारत विकसित राष्ट्र असेल : अर्थमंत्री
  2. यंदाच्या अर्थसंकल्पात कशावर भर? सामान्यांना दिलासा मिळणार का? जाणून घ्या, अर्थतज्ज्ञांचं मत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.