ETV Bharat / bharat

यूकेच्या निवडणुकीत विजयी होऊन 33 व्या वर्षी खासदार झालेले कनिष्क कोण आहेत? - Kanishka Narayan - KANISHKA NARAYAN

Kanishka Narayan Bihar Connection : बिहारच्या कनिष्क नारायण यांनी मुझफ्फरपूरच्या रस्त्यापासून ते ब्रिटनमध्ये खासदार होण्यापर्यंतचा प्रवास केलाय. त्यांच्या या कामगिरीनंतर बिहारच्या जनतेला त्यांचा अभिमान वाटू लागलाय.

muzaffarpur bihar connection of UK MP Kanishka Narayan
यूके खासदार कनिष्क नारायण (ETV Bharat Bihar)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 7, 2024, 2:04 PM IST

मुझफ्फरपूर Kanishka Narayan Bihar Connection : ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत यावेळी भारतीय वंशाच्या 29 खासदारांनी आपला झेंडा फडकवलाय. यामध्ये 33 वर्षीय कनिष्क नारायण यांचाही समावेश आहे. ते बिहारचे आहेत. बिहारच्या मुझफ्फरपूर येथील कनिष्क यांनी ब्रिटनमध्ये भारताचं नाव उंचावलं आहे. एकेकाळी मुझफ्फरपूर शहरातील रस्त्यांवर फिरणारे कनिष्क आता ब्रिटनमध्ये खासदार झाले आहेत. त्यांच्या या प्रवासानं बिहारसह संपूर्ण देशाला अभिमान वाटावा अशी स्थिती आहे.

वयाच्या 33 व्या वर्षी खासदार बनले : 33 वर्षीय कनिष्क नारायण यांनी ब्रिटिश संसदीय निवडणुकीत विजय मिळवलाय. ते वेल्सचे पहिले अल्पसंख्याक खासदार म्हणून निवडून आले आहे. कनिष्कचे कुटुंब मुझफ्फरपूरच्या दामूचक परिसरातील सोंधो हाऊसमध्ये राहते. त्यांचे काका जयंत कुमार हे एसकेजे लॉ कॉलेज, गन्नीपूरचे संचालक आहेत. तर त्यांची चुलत बहीण बर्फी आणि रॉकस्टार फेम बॉलीवूड अभिनेत्री श्रेया नारायण आहे.

"मुझफ्फरपूरनंतर, कनिष्क दिल्लीला गेला. तिथं त्यानं हायस्कूलपर्यंत शिक्षण घेतलं. त्यानंतर वयाच्या 12 व्या वर्षी तो आपल्या पालकांसह वेल्स, इंग्लंडला गेला. तेथे तो बराच काळ सरकारी कर्मचारी म्हणून कार्यरत राहिला. तेथे, आता वयाच्या 33 वर्षी ब्रिटीश खासदार झालाय" - जयंत कुमार, कनिष्कचे काका

मुझफ्फरपूरमधून शिक्षण घेतले : या संदर्भात कनिष्कच्या काकांनी सांगितलं की, "कनिष्कचे सुरुवातीचे शिक्षण मुझफ्फरपूरच्या प्रभात तारा स्कूलमधून झाले. तिसरी इयत्ता पूर्ण केल्यानंतर, तो त्याची आई चेतना सिन्हा आणि वडील संतोष कुमार यांच्यासोबत नवी दिल्लीला गेला. तेथून त्यानं हायस्कूलपर्यंतचं शिक्षण घेतलं. वयाच्या 12 व्या वर्षी, तो आपल्या पालकांसह वेल्स, इंग्लंड येथे गेला. चेतना आणि संतोष कार्डिफ, वेल्स येथे वकील आहेत."

"पुतण्या खासदार म्हणून निवडून आल्यानं संपूर्ण भारताला त्याचा अभिमान वाटतोय. कनिष्कनं शहरातून तिसरीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. कनिष्कचे वडील संतोष कुमार आणि आई चेतना सिन्हा यांच्यानंतर SKJ लॉ कॉलेजमधून शिक्षण पूर्ण करून, कनिष्क पुढील शिक्षणासाठी त्याच्या पालकांसह लंडनला गेला. - जयंत कुमार, कनिष्कचे काका

पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार : कनिष्क यांनी ऑक्सफर्ड आणि स्टॅनफोर्ड सारख्या विद्यापीठांमधून तत्त्वज्ञान, राजकारण आणि अर्थशास्त्र तसंच व्यवसायात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. त्यानंतर नागरी सेवक म्हणून काम केलंय. ते इंग्लंडमधील बॅरी येथे राहतात. डेव्हिड कॅमेरून सरकारमध्ये ते पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागारही राहिले आहेत.

हेही वाचा -

  1. बिहारमध्ये आणखी एका परीक्षेत हेराफेरी, 'मुन्नाभाई'सह 16 जणांना घेतलं ताब्यात - Exam cheating case
  2. हे बिहार आहे भावा! भोजपूरमध्ये डीजेच्या तालावर नाचत निघाली अनोखी अंत्ययात्रा, आनंद साजरा करण्यामागे आहे खास कारण
  3. बिहार विधानसभेत 'फ्लोअर टेस्ट'पूर्वी काय-काय घडामोडी घडतील? जाणून घ्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.