ETV Bharat / bharat

दिल्लीत ट्रिपल तलाकची दोन प्रकरणं उघडकीस, जाणून घ्या मुंबई कनेक्शन काय?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 27, 2024, 8:17 PM IST

Triple Talaq : दिल्लीत तिहेरी तलाकची दोन प्रकरणं समोर आलीत. दोन्ही प्रकरणात पत्नीच्या वतीनं तक्रार दाखल करण्यात आली आहे. कौटुंबिक हिंसाचार प्रकरणाच्या सुनावणीसाठी त्या दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात पोहोचली होत्या, जिथे ही बाब समोर आली. वाचा पूर्ण बातमी..

Triple Talaq
Triple Talaq

नवी दिल्ली Triple Talaq : राजधानी दिल्लीत तिहेरी तलाकची दोन प्रकरणं समोर आली आहेत. दोन्ही महिलांचा आरोप आहे की, त्या 2019 मुस्लिम विवाह कायदा आणि कौटुंबिक हिंसाचार प्रकरणाच्या सुनावणीसाठी दिल्लीच्या तीस हजारी न्यायालयात आल्या होत्या. परंतु त्यांच्या पतींनी त्यांना न्यायालयाबाहेरच घटस्फोट दिला. दोन्ही घटनांमध्ये पीडित महिलांनी पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे.

पहिलं प्रकरण : डीसीपी मनोज कुमार मीना यांनी सांगितलं की, 24 जानेवारी 2024 रोजी दोन महिलांच्या तक्रारीवरून तिहेरी तलाकचे दोन गुन्हे दाखल करण्यात आले. पहिल्या प्रकरणात महिलेनं सांगितलं की, तिचा 2019 मध्ये मुस्लिम विवाह कायद्यानुसार विवाह झाला होता. महिलेनं रसायनशास्त्रात पीएचडी केली आहे. तक्रारदार महिलेनं सांगितलं की, 11 जुलै 2023 रोजी तिच्या पतीनं तिला तिहेरी तलाक दिला. महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, महिलेच्या पतीनं घटस्फोटाचा गुन्हा दाखल केलेला नाही.

दुसरं प्रकरण : दुसरं प्रकरणही 24 जानेवारी 2024 रोजी उघडकीस आलं. महिलेनं तक्रारीत म्हटलं की, तिचा 18 फेब्रुवारी 2021 रोजी मुंबईतील एका व्यक्तीशी विवाह झाला होता. मात्र विवाहानंतर सासरच्या लोकांकडून तिचा छळ सुरू झाला. याची तिनं 3 ऑगस्ट 2023 रोजी तक्रार दाखल केली होती. तक्रारदार महिला दिल्लीला तिच्या पालकांकडे परतली आणि तिनं पती आणि सासरच्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

घटस्फोटाचा गुन्हा दाखल : पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पतीवर आरोप करताना महिलेनं सांगितलं की, ती 24 जानेवारी रोजी न्यायालयात कारवाईसाठी आली तेव्हा पतीनं तिला तिहेरी तलाक दिला. डीसीपी म्हणाले की, चौकशीनंतर घटस्फोटाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परंतु तक्रारदाराकडून घटस्फोटाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

हे वाचलंत का :

  1. लैंगिक छळ म्हणजे काय? अशा प्रकरणांमध्ये काय असू शकते शिक्षा, जाणून घ्या काय आहे कायदा?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.