नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेनं मुलांसह पालकांमध्ये मोठी दहशत पसरली. अज्ञात माथेफिरुन ईमेल करुन ही धमकी देण्यात आल्याची माहिती प्रशासनानं पोलिसांनी दिली. त्यामुळे पोलिसांनी तत्काळ घटनास्थळावर दाखल होत, तपासणी केली. अद्याप कोणताही अनुचित प्रकार घडला नसून खबरदारीचा उपाय म्हणून सगळ्या विद्यार्थ्यांना घरी पाठवण्यात आलं आहे, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
Two Delhi schools receive bomb threats via e-mail
— ANI Digital (@ani_digital) December 9, 2024
Read @ANI Story | https://t.co/fwPDovHS0e#Delhi #bombthreat #schools pic.twitter.com/sWeXF3N5pe
दोन शाळांना बॉम्बस्फोटनं उडवण्याची धमकी : दिल्लीतील दोन नामांकित शाळांना बॉम्बस्फोटाची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात माथेफिरुनं ईमेल करुन ही धमकी दिली आहे. आरके पुरममधील दिल्ली पब्लिक स्कूल आणि पश्चिम विहारमधील जीडी गोएंका पब्लिक स्कूलला बॉम्बस्फोटनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. याबाबत बोलताना दिल्ली पोलिसांनी सांगितलं की, "दिल्लीतील दोन शाळांना ईमेलद्वारे बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देण्यात आली आहे. आरके पुरममधील आणि दुसरी पश्चिम विहारमधील या शाळा आहेत. शाळा प्रशासनानं विद्यार्थ्यांना घरी परत पाठवलं आहे. अग्निशमन दल विभाग आणि पोलिसांना सकाळी सात वाजता माहिती देण्यात आली आहे."
दिल्लीतील प्रशांत विहारमध्ये बॉम्बस्फोट : या अगोदरही अनेकवेळा दिल्लीतील शाळा, विमानतळ, हॉटेल आणि इतर ठिकाणी बॉम्बस्फोटाच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. मात्र तपासाअंती या धमक्या खोट्या असल्याचं स्पष्ट झालं. काही दिवसांअगोदर दिल्लीतील प्रशांत विहारमध्ये बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात एक नागरिक जखमी झाला. या घटनेनंतर घटनास्थळी मोठा गोंधळ निर्माण झाला. या बॉम्बस्फोटाचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं.
सीआरपीएफच्या शाळेतही स्फोट : यापूर्वी दिल्लीतील रोहिणी इथल्या सीआरपीएफ शाळेजवळ स्फोट झाला. दोन महिन्यात राजधानी दिल्लीत दोन स्फोट झाले. त्यामुळे राजधानीतील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. रविवारी सायंकाळी दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सरकारवर हल्लाबोल केला. दिल्लीतील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असल्याचं सांगत त्यांनी दिल्ली पोलीस आमच्या अखत्यारित असल्यास कायदा आणि सुव्यवस्था चांगली राहिली असती, असंही सांगितलं.
हेही वाचा :