ETV Bharat / bharat

दोन बॉम्बस्फोटानंतर बिहारमधील दरभंगा येथे आढळले 6 जिवंत बॉम्ब - दरभंगातून बॉम्ब जप्त

Darbhanga Bomb Blast: बिहारमधील दरभंगा येथे काल (29 फेब्रुवारी) झालेल्या दोन बॉम्बस्फोटांनंतर पोलिसांनी 6 जिवंत बॉम्ब जप्त केले आहेत. बांधकामाधीन घरातून हे बॉम्ब सापडले आहोत. पोलीस घराच्या मालकाचा तपास करत आहेत.

Darbhanga Bomb Blast
दरभंगा बॉम्बस्फोट प्रकरण
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 1, 2024, 9:09 PM IST

बॉम्बस्फोट प्रकरणाविषयी माहिती देताना पोलीस अधिकारी

दरभंगा (बिहार) Darbhanga Bomb Blast : बिहार दारुगोळाच्या ढिगाऱ्यावर उभा आहे का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय. दरभंगामध्ये जिवंत बॉम्ब सापडल्याने हा प्रश्न उद्‌भवलाय. दरभंगा येथील एका बांधकामाधीन घरातून पोलिसांनी 6 बॉम्ब जप्त केले आहेत. मात्र, सर्व बॉम्ब निकामी करण्यात आले आहेत. पोलीस या प्रकरणाच्या खोलापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरभंगा येथे बॉम्ब जप्त : बॉम्ब जप्तीचे प्रकरण बहादूरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. तेथून पोलिसांनी छोट्या इमारतीवर छापा टाकून बॉम्ब जप्त केले. गुरुवारी रात्री घरातून दोन बॉम्ब फुटल्याचा आवाज ऐकून स्थानिक लोक घाबरले. याची माहिती तातडीनं पोलिसांना देण्यात आली.

काही मोठा कट रचण्याची भीती : माहिती मिळताच बहादूरपूर पोलीस ठाण्याचे पोलीस सक्रिय झाले. लगेच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. येथे बांधकाम सुरू असलेल्या घरातून 6 जिवंत बॉम्ब सापडले आहेत. गुन्हेगारांकडून काही मोठा कट रचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याआधीही दोन बॉम्बचे स्फोट होऊन घरात आग लागली होती.

"बहादूरगड पोलिसांना रात्री घरात स्फोट झाल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळावरून दोन स्फोट झालेल्या बॉम्बचे विखुरलेले तुकडे जप्त केले आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरून 6 जिवंत बॉम्बही जप्त केले आहेत. पुढील कारवाई सुरू आहे.'' - शुभम आर्य, शहर पोलीस अधीक्षक, दरभंगा

घरमालकाच्या सहभागाचा तपास सुरू: दरभंगा शहराचे एसपी शुभम आर्य म्हणाले की, ''जप्त केलेले बॉम्ब निकामी करण्यात आले आहेत. अर्धवट राहिलेल्या घराचा मालक मोहम्मद जावेद असल्याची माहिती मिळत आहे. यात घरमालकाचा सहभाग काय? याबाबत माहिती संकलित करण्यात येत आहे. या प्रकरणात मोहम्मद जावेदचा सहभाग आढळल्यास त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल.

हेही वाचा:

  1. आदिवासीतून धर्मांतर केलेल्या 257 प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांची चौकशी होणार, मंत्री मंगल प्रभात लोढा यांची माहिती
  2. मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निमंत्रण! शरद पवार यांच्या 'लंच डिप्लोमसी'मध्ये दडलंय काय?
  3. "राज्यातील गॅंगवॉर आता विधानभवनापर्यंत", भुसे-थोरवे धक्काबुक्की प्रकरणावरुन अंबादास दानवेंचा हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.