ETV Bharat / bharat

मनीष सिसोदिया दाखल होण्यापूर्वीच बदल्यांचा धडाका; दिल्ली शिक्षण विभागातील 100 मुख्याध्यापकांसह अधिकाऱ्यांच्या बदल्या - Delhi Education Department Transfer - DELHI EDUCATION DEPARTMENT TRANSFER

Delhi Education Department Transfer : दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन दिला. मात्र मनीष सिसोदिया यांना जामीन मिळाल्यानंतर लगेच शिक्षण विभागातील तब्बल 100 मुख्याध्यापक आणि अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

Delhi Education Department Transfer
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 10, 2024, 12:58 PM IST

नवी दिल्ली Delhi Education Department Transfer : दिल्लीचे माजी शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांना दिल्ली दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलं होतं. मनीष सिसोदिया यांना शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानं जामीन दिल्यानंतर त्यांची तुरुंगातून सुटका झाली. मात्र मनीष सिसोदिया यांच्या सुटकेच्या 24 तास आधीच दिल्लीच्या शिक्षण विभागात मोठे फेरबदल करण्यात आले. दिल्लीतील शिक्षण संचालनालयात वर्षानुवर्षे कार्यरत असलेल्या 100 मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि शिक्षक कर्मचाऱ्यांची बदली क्षमतेच्या आधारे करण्यात आली आहे. या सर्वांना शिक्षण विभागाच्या कार्यालयातून कार्यमुक्त करुन संबंधित शाळांमध्ये पाठवण्याचे आदेश जारी करण्यात आलं.

Delhi Education Department Transfer
100 मुख्याध्यापकांसह अधिकाऱ्यांच्या बदल्या (ETV Bharat)

अनेक वर्षापासून दिल्लीत बजावत होते कर्तव्य : शिक्षण संचालनालयाच्या अपर शिक्षण संचालक (प्रशासन) यांनी 8 ऑगस्टला काढलेल्या आदेशानुसार सरकारी शाळांमध्ये कार्यरत 100 मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि शिक्षकांची बदली करण्यात आली. हे 100 जण डेप्युटेशनवर संचालनालयात नियुक्त करण्यात आले होते. वर्षानुवर्षे ते विविध विभाग आणि शाखांमध्ये कर्तव्य बजावत होते. या सर्व मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक आणि शिक्षकांना त्यांच्या शाळेत परत पाठवण्याचे आदेश आता शिक्षण संचालनालयानं जारी केले. यामध्ये 61 शिक्षक वर्षानुवर्षे अशैक्षणिक जबाबदारी पार पाडत होते.

कार्यालयीन कामकाजातून केली मुक्तता : दिल्ली शिक्षण संचालनालयाच्या मुख्यालयात, प्रादेशिक संचालक (शिक्षण), जिल्हा कार्यालय आणि परिमंडळ कार्यालयात कार्यरत असलेल्या सर्वांना पदावरुन मुक्त करण्यात येईल, असं आदेशात स्पष्ट करण्यात आलं. या सगळ्यांची तत्काळ प्रभावानं त्यांच्या मूळ शाळांमध्ये बदली करण्यात आली. या यादीत समाविष्ट नसलेल्या कंत्राटी आणि अतिथी शिक्षकांनाही तातडीनं संबंधित शाळांमध्ये रुजू होण्यास सांगण्यात आलं आहे.

Delhi Education Department Transfer
दिल्ली शिक्षण विभाग (ETV Bharat)

हेही वाचा :

  1. दिल्ली दारू घोटाळा ; तब्बल 17 महिन्यानंतर कारागृहाबाहेर येणार मनीष सिसोदिया, सर्वोच्च न्यायालयानं मंजूर केला जामीन - SC Grants Bail To Manish Sisodia
  2. Delhi excise policy scam : मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला जामीन अर्ज
  3. Delhi Liquor Scam : ईडीची मोठी कारवाई, मनीष सिसोदियांची करोडोंची मालमत्ता जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.