ETV Bharat / bharat

बालासोरप्रमाणं रेल्वे अपघात टळला! पंजाबमध्ये दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक, नेमकं काय घडलं? - Fatehgarh Sahib Train Accident

Train Accident In Punjab : पंजाबमध्ये दोन मालवाहू गाड्या एकमेकांना धडकल्यानं मोठा अपघात झालाय. या अपघातात 2 लोको पायलट जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

train accident in punjab
पंजाब रेल्वे अपघात (Source ETV Bharat Punjab Desk)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 2, 2024, 11:10 AM IST

Updated : Jun 2, 2024, 11:17 AM IST

चंदीगड Train Accident In Punjab : श्री फतेहगढ साहिब येथे आज पहाटे 4 वाजता दोन मालवाहू गाड्यांची टक्कर झाली. त्यातील एकाचे इंजिन उलटून बाजूच्या रुळावरून जाणाऱ्या पॅसेंजर ट्रेनला धडकले. या अपघातात मालगाडीचे दोन पायलट जखमी झाले. त्यांना पटियाला येथील राजिंद्र हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.

दोन मालवाहू गाड्यांची टक्कर : हा अपघात ओडिशातील बालासोर येथे गेल्या वर्षी झालेल्या अपघातासारखाच होता. त्या अपघातात दुसरी ट्रेन आली. आधीच रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या ट्रेनला धडकली. या धडकेदरम्यान तेथून जाणाऱ्या तिसऱ्या वाहनाचाही अपघात झाला. या रेल्वे अपघातात 293 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. तर 1000 हून अधिक लोक जखमी झाले होते. फतेहगड साहिबमधील या अपघाताची रूपरेषा काहीशी अशीच आहे. मात्र वेग कमी असल्यानं मोठी दुर्घटना टळली.

अपघातात पॅसेंजर ट्रेनचेही नुकसान : या संदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरच्या न्यू सरहिंद स्टेशनवर कोळशानं भरलेली ट्रेन रोपरला पाठवली जाणार होती. त्याच ट्रॅकवर मागून कोळशानं भरलेली दुसरी रेल्वे आली. ही रेल्वे आधीच उभ्या असलेल्या कोळशाच्या मालवाहू ट्रेनला धडकली. त्यामुळं मालगाडीचे इंजिन उलटले.

दरम्यान, कोलकाताहून जम्मूला जाणारी विशेष उन्हाळी ट्रेन (04681) अंबालाहून लुधियानाकडे रवाना झाली. ही गाडी नवीन सरहिंद स्थानकाजवळ आली तेव्हा तिचा वेग कमी होता. यावेळी दोन मालवाहू गाड्यांची धडक झाली. या धडकेनंतर इंजिन उलटल्यावर ते पॅसेंजर ट्रेनलाही धडकले.

जीवितहानी टळली : पॅसेंजर ट्रेनचा वेग कमी असल्यामुळं चालकानं तात्काळ ट्रेन थांबवली आणि त्यामुळं मोठी दुर्घटना टळली. मात्र, ट्रेनचे अंशत: नुकसान झालंय. यासोबतच ट्रॅकची दुरवस्था झाली आहे. अपघातानंतर दुसरं इंजिन लावून पॅसेंजर ट्रेन राजपुरा येथे रवाना करण्यात आली. यासोबतच ट्रॅक दुरुस्त करण्याचं काम सुरू करण्यात आलंय. अपघातानंतर रेल्वे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांनी इंजिनची खिडकी तोडून आत अडकलेल्या लोको पायलटची सुटका केली. तेथून त्यांना रुग्णालयात नेण्यात आलं.

पुढील तपास सुरू : अपघातानंतर रेल्वे विभाग विविध पैलूंवर तपास करत आहे. चौकशीचा मुख्य मुद्दा असा आहे की, एक मालवाहू गाडी आधीच रुळावर उभी असताना त्याच मार्गावर दुसरी गाडी कशी आली? तसंच मालवाहू गाडीला त्याच मार्गावर येण्याचा सिग्नल मिळाला तर चालकाला समोर उभी असलेली दुसरी गाडी का दिसली नाही. अपघातामागील निष्काळजीपणाचा तपास करण्यात येत आहे. तर अंबाला ते लुधियाना अप मार्ग ठप्प झालाय. दरम्यान, अंबाला विभागाच्या डीआरएमसह रेल्वे, जीआरपी आणि आरपीएफचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी पोहोचले आहेत.

हेही वाचा -

  1. Sabarmati Express Accident : अजमेरजवळ रेल्वेचा भीषण अपघात; रेल्वे स्थानकावर उभ्या मालगाडीला धडकली साबरमती एक्सप्रेस
  2. जामतारा येथे रेल्वेच्या धडकेत 2 जणांचा मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
  3. Andhra Pradesh Train Accident : आंध्र प्रदेश रेल्वे अधिकाऱ्यांनी रेल्वे अपघाताचं सांगितलं 'हे' कारण, मृतांचा आकडा 14 वर पोहोचला!

Last Updated : Jun 2, 2024, 11:17 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.