नवी दिल्ली Arvind Kejriwal in Jail : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आणि राज्यसभा खासदार संजय सिंह बुधवारी दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैद असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेऊ शकणार नाहीत. कारण तिहार तुरुंग प्रशासनानं दोन्ही नेत्यांना भेटण्यास नकार दिलाय. आता तिहार तुरुंग प्रशासन भेटीसाठी नवीन वेळ जाहीर करेल असं सांगितलं जातंय. तिहार कारागृहानं सुरक्षेचचे कारण सांगत भेटण्यास नकार दिलाय. बुधवारी भगवंत मान आणि संजय सिंह हे केजरीवालांना आज दुपारी 1 वाजता भेटणार होते.
पक्षाचा नेता पहिल्यांदाच तुरुंगात घेणार होता भेट : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी यापूर्वीच तिहार तुरुंग प्रशासनाला पत्र लिहून अरविंद केजरीवाल यांना भेटण्याची परवानगी मागितली होती. तुरुंग प्रशासनानं त्यांना केजरीवाल यांना भेटण्याची परवानगी दिली असली तरी ती परवानगी 'जंगला' भेटीसाठी देण्यात आली होती. 'जंगला' भेटीत कैदी आणि भेटायला आलेल्यांमध्ये खिडकीच्या आकाराची जागा असते. याद्वारे दोघेही एकमेकांशी बोलू शकतात. अरविंद केजरीवाल हे तिहार तुरुंगात गेल्यानंतर पहिल्यांदाच आप पक्षाचा नेता त्यांना भेटायला जात आहे. त्यामुळं ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात होती.
केजरीवालांची सर्वोच्च न्यालायलात धाव : मंगळवारी दिल्ली उच्च न्यायालयाकडून केजरीवाल यांना जामिनावर कोणताही दिलासा मिळाला नाही. त्यामुळे भाजपाकडून आम आदमी पक्षावर हल्लाबोल करण्यात येत आहे. केजरीवाल यांच्या अटकेबाबत भाजपा आणि केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी आपचे नेतेही सातत्यानं आपली रणनीती वापरत आहेत. तर दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात अरविंद केजरीवाल यांनी अखेर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतलीय. यानंतर आता केजरीवांलांना सर्वोच्च नायालयात दिलासा मिळेल का हे पाहावं लागेल.
हेही वाचा :
- अरविंद केजरीवालांना दिल्ली न्यायालयाचा मोठा झटका; अटकेविरोधातली याचिका फेटाळली - Verdict On Arvind Kejriwal Bail
- अरविंद केजरीवालांच्या आणखी एका मंत्र्याला नोटीस; भाजपानं केली होती निवडणूक आयोगाकडं तक्रार - Election Commission Notice to AAP
- तुरुंगातून बाहेर पडताच संजय 'सिंह' यांची गर्जना, 'आप'चा संघर्ष करण्याचा निर्धार - MP Sanjay Singh granted bail