ETV Bharat / bharat

पहाटेच्या डुलकीनं केला घात, कार-ट्रकच्या धडकेत सहा तरुणांचा जागीच मृत्यू

Tenkasi accident : तामिळनाडू राज्यातील तेनकाशी येथे भीषण अपघात झाला. आज पहाटे कार आणि सिमेंट वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक झाली. त्यामध्ये 6 तरुणांचा मृत्यू झाला.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 28, 2024, 10:54 AM IST

Updated : Jan 28, 2024, 12:26 PM IST

Tenkasi accident
तेनकाशी अपघात
कार-ट्रकच्या धडकेत सहा जणांचा मृत्यू

चेन्नई : Tenkasi accident : तामिळनाडूतील तेनकाशी येथे आज रविवार पहाटे 3.45 वाजेच्या सुमारास कार आणि ट्रकचा अपघात झाला. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. कुट्टलम धबधब्यावरू परत जात असताना सिमेंट घेऊन जाणाऱ्या ट्रक-कारची टक्कर झाली. जेसीबीच्या मदतीनं ट्रकच्या खाली दबलेल्या कारला बाहेर काढण्यात आलं. कार्तिक, वेल, मनोज, सुब्रमण्यम, मनोहरन आणि मुदिराज अशी मृतांची नावं आहेत. ते मूळचे कडयानल्लूर जिल्ह्यातील चिंतामणी गावचे रहिवाशी आहेत. हे सर्व तरुण १७ ते २८ वयोगटातील होते. या घटनेनंतर तात्काळ पोलीस प्रशासनाने धाव घेत अपघातग्रस्तांना मदत केली.

पोलिसांनी गुन्हा नोंदवला : तेनकासी जिल्ह्यातील पुलियानगुडी येथील भगवती अम्मन टेम्पल स्ट्रीट परिसरातील 6 तरुण काल शनिवार 27 जानेवारी रात्री पुलियांगुडी येथील बालसुब्रमण्यम स्वामी मंदिर महोत्सवात भाग घेतला. त्यानंतर ते कोर्टलम वॉटरफॉलम येथे गेले. तिथून ते परत जात असताना जिल्ह्यातील पुलियांगुडीजवळ सिमेंटची पोती घेऊन जाणाऱ्या ट्रकला कारची धडक बसली. या भीषण अपघातात पुलियांगुडी परिसरातील 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. चोक्कमपट्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अपघाताचा तपास सुरू आहे.

चालकाला झोप लागल्याची शक्यता : आज पहाटे साडेतीन वाजता ते कोर्टल्लमहून पुलियांगुडीला कारने परतत होते. पुन्नय्यापुरम आणि सिंगलीपट्टी दरम्यान पुलियांगुडीजवळ गाडी चालवत असताना चालकाला झोप लागली. त्यानंतर कार ट्रकवर आदळली. कार ट्रकखाली अडकल्यानं कारचे अनेक तुकडे झाले. घटनेची माहिती मिळताच चोक्कमपट्टीचे पोलीस उपअधीक्षक आणि अग्निशमन विभागाचे जवान घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बचावकार्य सुरू केलं. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी तिरुनेलवेली सरकारी रुग्णालयात नेण्यात आले.

हेही वाचा :

1 'महागठबंधन' तोडून कशामुळे दिला मुख्यमंत्री पदाचा राजीनामा? नितीश कुमार यांनी 'हे' सांगितलं कारण

2 अज्ञात हल्लेखोरांकडून इराणमध्ये 9 पाकिस्तानी नागरिकांची हत्या; दोन देशांमध्ये पुन्हा वाढणार तणाव

3 हरियाणात भरधाव कारनं दुचाकीस्वारांना चिरडलं, 4 वेटरचा जागीच मृत्यू; सीसीटीव्ही पाहून येईल अंगावर काटा

Last Updated : Jan 28, 2024, 12:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.