हैदराबाद Priests Gift Bull To Muslim Farmer : बैल नसल्यानं संकटात सापडलेल्या एका मुस्लीम शेतकऱ्याला मंदिराच्या पुजाऱ्यांनी बैल भेट दिला. ही अभिमानास्पद घटना हैदराबादमध्ये घडली. हैदराबादमधील सुप्रिसद्ध असलेलं चिल्कूर बालाजी मंदिराचे पुजारी यांनी मोहम्मद गौस या मुस्लीम शेतकऱ्याला बैल भेट दिला आहे. मोहम्मद गौस यांच्याकडं फक्त एकच बैल असल्यानं त्यांना अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र चिल्कूर बालाजी मंदिरातील पुजाऱ्यांनी या शेतकऱ्याला बैल भेट देऊन समाजापुढं एक आदर्श निर्माण केला आहे.
मोहम्मद गौस यांच्याकडं होता एकच बैल : मोईनाबाद परिसरातील चिलुकूर इथं राहणाऱ्या मोहम्मद गौस हे शेती करुन आपली उपजीविका करतात. मोहम्मद गौस यांच्याकडं बैलजौडी होती. मात्र काही वर्षापूर्वी मोहम्मद गौस यांच्या एका बैलाला चरत असताना विजेचा धक्का लागला. या दुर्घटनेत मोहम्मद गौस यांच्या एका बैलाचा मृत्यू झाला. त्यामुळे मोहम्मद गौस यांना शेती करताना अडचणींचा सामना करावा लागत होता. बैल विकत घेण्यासाठी पैसे नसल्यानं त्यांना शेती करणं मोठं कठीण जात होतं.
मोहम्मद गौस यांना दिला बैल भेट : चिलुकूर इथल्या मोहम्मद गौस या शेतकऱ्याला बैल नसल्यानं मोठी अडचण होत असल्याचं चिल्कूर बालाजी मंदिराच्या पुजाऱ्यांना कळलं. त्यानंतर सी एस रंगराजन यांच्या नेतृत्वात मंदिराच्या पुजाऱ्यांनी मोहम्मद गौस यांना मदतीचा हात पुढं करण्याचं ठरवलं. चिल्कूर बालाजी मंदिरात मंगळवारी या पुजाऱ्यांनी याबाबतचा निर्णय घेत मोहम्मद गौस यांना बैल भेट दिला. संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला मंदिराच्या पुजाऱ्यांनी बैल भेट दिल्यानं पुजाऱ्यांचं मोठं कौतुक करण्यात येत आहे.
पुजाऱ्यांनी या अगोदरही दिली आहे गाय आणि बैल भेट : चिल्कूर बालाजी मंदिराच्या पुजाऱ्यांनी मोहम्मद गौस या शेतकऱ्याला बैल भेट दिल्यानं मोठी चर्चा करण्यात येत आहे. मात्र या अगोदरही चिल्कूर बालाजी मंदिरातील पुजाऱ्यांनी शेतकऱ्याला बैल भेट दिला आहे. या पुजाऱ्यांनी पेद्दमंगलाराम इथल्या शेतकरी अंजिया यांना एक बैल भेट दिला होता. त्यासह सिद्धीपेटमधील एका गरीब शेतकऱ्याला गाय भेट दिली होती. त्यामुळे गरीबीशी झगडणाऱ्या शेतकऱ्यांना मंदिराच्या पुजाऱ्यांनी बैल भेट दिल्यानं त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा :