दिंडीगल (तामिळनाडू) : दिंडीगल-त्रिची रोडवरील एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयात (फ्रॅक्चर उपचारांसाठी) आज रात्री आग लागली. याबाबत माहिती मिळताच अग्निशमन दल आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. रुग्णालयातील रुग्णांना बाहेर काढण्याचा अटोकाट प्रयत्न सुरू आहे.
आग विझवण्याच्या कामात चार पेक्षा जास्त अग्निशमन गाड्या जुंपल्या असून रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यासाठी दहाहून अधिक रुग्णवाहिकांचा वापर करण्यात येत आहे. ही माहिती देण्यात आली आहे. याशिवाय, लिफ्टमध्ये अडकलेल्यांना बाहेर काढून दिंडीगलमधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात पाठवण्याच्या कामात अग्निशमन विभाग, आसपासचे लोक, पोलीस आणि डॉक्टर सहभागी झाले आहेत.
जिल्हाधिकारी पुंगोडी आणि पलानीचे आमदार आयबी सेंथिलकुमार ही घटना घडलेल्या भागाची पाहणी करत आहेत. या आगीच्या अपघाताचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. पोलीस घटनेचा तपास करत आहेत.
सात जण ठार : आगीच्या दुर्घटनेत एक लहान मूल, तीन पुरुष आणि तीन महिलांसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर इतर अनेकांना गंभीर दुखापत झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आलं आहे.