ETV Bharat / bharat

तामिळनाडूमध्ये कॉटन कँडीच्या विक्रीवर बंदी, जाणून घ्या काय आहे कारण? - कॉटन कॅंडीवर बंदी

Cotton Candy Ban: तामिळनाडू सरकारने कॉटन कॅंडी अर्थात लहान मुलांमध्ये प्रिय असलेल्या 'बुड्डी के बाल' या पदार्थाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. यामध्ये वापरण्यात येणाऱ्या 'रोडामाइन बी' या केमिकलमुळे कर्करोगासह इतर गंभीर आजार होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ही बाब विचारात घेऊन बंदी घालण्यात आली आहे.

sale of cotton candy
कॉटन कॅंडी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 17, 2024, 10:21 PM IST

Updated : Feb 17, 2024, 10:55 PM IST

चेन्नई (तामिळनाडू) Cotton Candy Ban : तामिळनाडू सरकारने कॉटन कँडीच्या विक्रीवर बंदी घातली आहे. कॉटन कँडीला 'फेरी फ्लॉस' किंवा 'बुद्धी के बाल' असेही म्हणतात. त्याच्या उत्पादनाशी संबंधित आरोग्य धोक्यांमुळे पुद्दुचेरीमध्ये अशाच प्रकारची कारवाई केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आलं आहे. येथे कॉटन कँडीमध्ये 'रोडामाइन बी' या गंभीर आरोग्य समस्यांशी संबंधित पदार्थासह विषारी रसायने आढळून आली आहेत.

कॉटन कॅंडीमध्ये 'रोडामाइन बी'चा सर्रास वापर : कॉटन कँडी ही कातलेल्या साखरेपासून बनवलेली एक लोकप्रिय गोड ट्रीट आहे. लहान मुलांमध्ये हा पदार्थ 'बुड्डी का बाल' म्हणून ओळखला जातो. हा पदार्थ मुले आवडीने खातात. बहुतेकदा सर्व वयोगटातील लोक याचा आनंद घेतात. तथापि, अलीकडील निष्कर्षांवरून असे दिसून आले आहे की, काही विक्रेते कॉटन कँडीशी संबंधित रंग वाढविण्याकरिता रोडामाइन बी' सारखी हानिकारक रसायने वापरत आहेत.

'रोडामाइन बी'च्या सेवनामुळे कर्करोगाचा धोका : 'रोडामाइन बी' हे सामान्यतः रंग म्हणून वापरले जाणारे रासायनिक संयुग आहे. परंतु संभाव्य आरोग्य धोक्यांमुळे अन्नामध्ये वापरण्यास बंदी आहे. अभ्यासातून असे दिसून आले आहे की, 'रोडामाइन बी'च्या दीर्घकाळापर्यंत सेवनामुळे कर्करोग, यकृताचे नुकसान आणि विषबाधा सारखी परिस्थिती यासह गंभीर आरोग्य समस्या उद्‌भवू शकतात.

कॉटन कॅंडी खरेदी करणे टाळण्याचे आवाहन : तामिळनाडूमध्ये कॉटन कँडीवर बंदी हा सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. विशेषत: अशा रसायनांच्या हानिकारक प्रभावांमुळे अधिक असुरक्षित असलेल्या मुलांचे संरक्षण करण्यासाठी एक सावधगिरीचा उपाय आहे. पालकांनी त्यांच्या मुलांसाठी कॉटन कँडी खरेदी करणे टाळावे आणि 'रोडामाइन बी' असलेल्या इतर खाद्यपदार्थांपासून सावध राहण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो.

  • जनतेकडून सरकारच्या निर्णयाचे स्वागत : तामिळनाडू सरकारच्या या निर्णयाचे आरोग्याचे तज्ज्ञ आणि जनतेनं स्वागत केले आहे. दूषित अन्न उत्पादनांशी संबंधित आरोग्य धोके टाळण्यासाठी अन्न सुरक्षा आणि नियमनाच्या महत्त्वावर जोर दिला आहे.

हेही वाचा:

  1. बारामतीमधील संस्थांच्या स्थापनेवेळी आरोप करणारे काय वयाचे होते? शरद पवारांचा अजित पवारांना खोचक टोला
  2. लोकसभा निवडणुकीची काय आहे तयारी? राष्ट्रीय निवडणूक आयोगानं दिली महत्त्वाची माहिती
  3. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना चहाचा आधार! वर्षभरात तब्बल 'इतक्या' कोटींचा घेतला चहा; वाचा खास रिपोर्ट

Last Updated : Feb 17, 2024, 10:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.