ETV Bharat / bharat

अरविंद केजरीवाल यांना 'सर्वोच्च' दिलासा ; दिल्ली दारू घोटाळ्यात जामीन मंजूर - SC Grants Bail To Arvind Kejriwal - SC GRANTS BAIL TO ARVIND KEJRIWAL

SC Grants Bail To Arvind Kejriwal : दिल्ली दारू घोटाळ्यात सर्वोच्च न्यायालयानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

SC Grants Bail To Arvind Kejriwal
संपादित छायाचित्र (ETv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 13, 2024, 10:54 AM IST

Updated : Sep 13, 2024, 11:28 AM IST

नवी दिल्ली SC Grants Bail To Arvind Kejriwal : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. अरविंद केजरीवाल यांना दिल्ली दारू घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालयाकडून अटक करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर सीबीआयनंही गुन्हा दाखल केला. मात्र या प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर निकाल दिला. त्यामुळे आजचा दिवस हा अरविंद केजरीवाल यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार कारागृहात आहेत. दिल्ली दारू घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी निकाल राखून ठेवला होता.

दिल्ली दारू घोटाळ्यात अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा : दिल्ली दारू घोटाळ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अंमलबजावणी संचालनालयानं अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयाकडून जामीन देण्यात आला होता. मात्र या प्रकरणात सीबीआयनंही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र अरविंद केजरवाल यांनी सीबीआयनं दाखल केलेल्या गुन्ह्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सीबीआयनं दाखल केलेल्या या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात मागील आढवड्यात सुनावणी पूर्ण झाली. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं आज आपला निर्णय सुनावला. मुख्यमंत्री पदावर असल्यानं अरविंद केजरीवाल साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात, त्यामुळे त्यांना जामीन देऊ नये, अशी भूमिका सीबीआयच्या वतीनं मांडण्यात आली होती. मात्र त्यानंतरही सर्वोच्च न्यायालयानं अरविंद केजरीवाल यांना न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती उज्जल भुईया यांचे खंडपीठानं जामीन मंजूर केला.

हेही वाचा :

  1. महाराष्ट्रात 'आप' विधानसभा निवडणूक स्वबळावर लढण्याच्या पवित्र्यात, 288 जागांवर उमेदवारांची चाचपणी सुरू - Vidhan Sabha Election 2024
  2. तुरुंगात अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट; संजय सिंह यांचा भाजपावर गंभीर आरोप - Arvind Kejriwal Health
  3. अरविंद केजरीवाल यांना मोठा दिलासा ; सर्वोच्च न्यायालयानं दिला अंतरिम जामीन - SC Granted Bail To Arvind Kejriwal
Last Updated : Sep 13, 2024, 11:28 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.