नवी दिल्ली SC Grants Bail To Manish Sisodia : दिल्ली दारू घोटाळ्यात अटक करण्यात आलेले दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला आहे. मनीष सिसोदिया यांना सर्वोच्च न्यायालयानं आपला पोसपोर्ट जमा करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासह कोणत्याही साक्षिदारांवर दबाव टाकण्यात येऊ नये, अशी अटही सर्वोच्च न्यायालयानं जामीन देताना मनीष सिसोदिया यांना घातली आहे.
#WATCH | Delhi | Sweets being distributed at the residence of AAP leader Sanjay Singh as Supreme Court grants bail to AAP leader Manish Sisodia in the excise policy irregularities case. pic.twitter.com/aVAxLNnryF
— ANI (@ANI) August 9, 2024
मनीष सिसोदिया यांना जामीन : सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती के व्ही विश्वनाथन यांच्या खंडपीठात मनीष सिसोदिया यांच्या जामीन याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी निर्णय देताना न्यायमूर्ती बी आर गवई यांनी जामीन मंजूर करताना, "आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर जलद सुनावणी घेणं हा त्यांचा अधिकार आहे. मनीष सिसोदिया यांना पुन्हा ट्रायल न्यायालयात पाठवणं योग्य ठरणार नाही. मनीष सिसोदिया यांना 18 महिन्याच्या कारावासाची शिक्षा तुरुंगवास झाला आहे. अद्याप हा खटाल सुरूही झाला नाही. त्यामुळे मनीष सिसोदिया यांना जलद न्यायालयात जाण्याच्या अधिकारापासून वंचित ठेवता येत नाही. ट्रायल कोर्ट आणि हायकोर्टानं याकडं लक्ष घालायला हवं."
Supreme Court grants bail to AAP leader Manish Sisodia in the excise policy irregularities case pic.twitter.com/5alhh0uL5l
— ANI (@ANI) August 9, 2024
सत्याचा विजय झाला - संजय सिंह : मनीष सिसोदिया यांच्या जामीन अर्जावर झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं आज सुनावणी घेतली. यावेळी सर्वोच्च न्यायालयानं मनीष सिसोदिया यांना जामीन मंजूर केला. यावेळी बोलताना आम आदमी पार्टीचे नेते संजय सिंह यांनी आनंद व्यक्त केला. ते म्हणाले की, दिल्ली दारू घोटाळ्यात कोणतंही तथ्य नाही. आमच्या नेत्यांना बळजबरीनं अटक करुन तुरुंगात टाकण्यात आलं. आमच्या नेत्याला तरुंगात टाकून त्यांच्या आयुष्यातील 17 महिने वाया घालवले, त्याचे उत्तर कोण देणार, असा सवालही त्यांनी यावेळी केला.
हेही वाचा :
- जेल के ताले टूटेंगे, केजरीवाल-सिसोदिया सत्येंद्र जैन छूटेंगे! तुरुंगाबाहेर येताच 'आप' नेते संजय सिंह गरजले - Sanjay Singh Out Of Jail
- Delhi excise policy scam : मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, सर्वोच्च न्यायालयानं फेटाळला जामीन अर्ज
- Delhi Liquor Scam : ईडीची मोठी कारवाई, मनीष सिसोदियांची करोडोंची मालमत्ता जप्त