कोटा Student Suicide in Kota : नीटची तयारी करणाऱ्या एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना कोटातील एका कोचिंग सेंटरमधून पुढं आली आहे. मोहम्मद जैद असं आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचं नाव आहे. मोहम्मद जैदनं विसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केली आहे. मोहम्मद जैद हा उत्तर प्रदेशातील मुरादाबाद इथला रहिवाशी होता. त्यानं कोटातील न्यू राजीव गांधी नगरमधील कांचन रेसिडेन्सी इथं मंगळवारी साडेनऊ वाजता आत्महत्या केली आहे.
वसतिगृहाच्या खोलीत केली आत्महत्या : मोहम्मद जैद यानं त्याच्या खोलीत मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता आत्महत्या केली. त्याच्या गावातीलचं त्याचा मित्र खोलीत जाण्यासाठी आला असता, मोहम्मद जैदनं दरवाजा उघडला नाही. त्यामुळं ही घटना उघडकीस आली. याबाबत जवाहर नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी देवेंद्र सिंह यांनी सांगितलं की, "न्यू राजीव गांधी नगर इथल्या कांचन रेसिडेन्सी इथं मंगळवारी रात्री विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. पोलीस घटनास्थळी पोहोचले, तेव्हा मोहम्मद जैद हा आत्महत्या केलेल्या अवस्थेत आढळून आला होता. मोहम्मद जैद आणि त्याच्या गावातील सोबत शिकणारे मित्र एकत्र या वसतिगृहात राहतात. त्यांनी मोहम्मद जैद हा रात्री अभ्यास करायचा आणि दिवसा जेवण करुन झोपायचा असं सांगितलं. त्यावरुन पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे."
मित्रामुळं आली घटना उघडकीस : मोहम्मद जैद याच्या मित्रानं त्याला फोन केला, मात्र त्यानं प्रतिसाद दिला नाही. मोहम्मद जैदनं दरवाजा न उघडल्यानं त्याच्या मित्रानं खिडकीतून पाहिल्यानंतर त्यानं आत्महत्या केल्याचं उघड झालं. त्यामुळं त्याच्या मित्रानं घटनेची माहिती वसतिगृह चालक आणि पोलिसांना दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन एमबीएस रुग्णालयाच्या शवागृहात ठेवल्याची माहिती पोलीस अधिकारी देवेंद्र सिंह यांनी सांगितली. जैदच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. त्याचे काका कोटा इथं पोहोचले असून पुढील कारवाई सुरू आहे.
खोलीत आढळली नाही सुसाईड नोट : मोहम्मद जैद यानं आत्महत्या केलेल्या खोलीत कोणतीही सुसाईड नोट आढळून नाही. मोहम्मद जैद हा बारावीनंतर नीटची तयारी करत होता. त्याचा हा नीटचा दुसरा प्रयत्न होता. येत्या काही दिवसात इतर तपासणी करण्यात येईल, अशी माहिती पोलीस उपाधीक्षक भवानी सिंह यांनी दिली.
खोलीत नव्हता आत्महत्या विरोधी रॉड : कोट इथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या खोलीस आत्महत्या विरोधी रॉड बसवण्याच्या सूचना सर्व वसतिगृह चालकांना देण्यात आल्या आहेत. मात्र प्रशासनाच्या कडक सूचनांकडं वसतिगृह संचालक कानाडोळा करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळं मोहम्मद जैदच्या आत्महत्येप्रकरणात वसतिगृह चालकाचा दोषही दिसून येत आहे. वसतिगृहातील पंख्यावर आत्महत्या प्रतिबंधक रॉड बसवलेला असल्यास त्यावर 40 किलोपेक्षा जास्त वजन लटकलं, तो पंखा स्प्रिंगसारखा खाली येतो आणि सिग्नल देतो. यामुळं आत्महत्येचा प्रयत्न करणारी मुलं ओळखली जातात. त्यांना आत्महत्येपासून परावृत केलं जाते. याबाबत माहिती देताना पोलीस उपाधीक्षक भवानी सिंह यांनी "जिल्हाधिकारी आणि आत्महत्या रोखण्यासाठी कार्यरत असलेल्या समितीला पत्र देण्यात येणार आहे. आत्महत्याविरोधी रॉड असता, तर त्या विद्यार्थ्याला आत्महत्येपासून वाचवता आलं असतं. मात्र हा रॉड न बसवल्यानं वसतिगृह चालकावर कारवाई करता येईल."
हेही वाचा :