ETV Bharat / bharat

हार्दिक पांड्या सोशल मीडियात ट्रोल, 'या' बॉलिवूड अभिनेत्याकडून हार्दिक पांड्याचं समर्थन - Sonu Sood supports Hardik Pandya - SONU SOOD SUPPORTS HARDIK PANDYA

Sonu Sood supports MI Captain Hardik Pandya : मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याला सोशल मीडियात ट्रोल करण्यात येत आहे. यावरून बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं पोस्ट करत हार्दिक पांड्याचं समर्थन केल्याचं दिसून येत आहे.

Sonu Sood supports MI Captain Hardik Pandya

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 29, 2024, 6:31 PM IST

मुंबई Sonu Sood supports MI Captain Hardik Pandya : इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये यावेळी 10 संघांमध्ये चुरशीची लढत होत आहे. आयपीएलच्या 17 व्या मोसमात पाचवेळा चॅम्पियन टीम मुंबई इंडियन्स संघाचा सध्या वाईट काळ सुरू आहे. मुंबई इंडियन्स संघानं नुकतेच दोन सामने खेळले आहेत. या दोन्ही सामन्यात त्यांचा पराभव झाला आहे. मुंबई इंडियन्स संघाच्या पराभवाचं खापर नवा कर्णधार हार्दिक पांड्यावर फोडलं जात आहे. हार्दिकला सोशल मीडियात ट्रोल केलं जात असून त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न जगभरात होत आहे. त्यातच 'गरिबांचे मसिहा' म्हणून प्रसिद्ध असणारे बॉलिवूड अभिनेता सोनू सूदनं एक पोस्ट शेअर केलीय. यात सोनू हार्दिक पांड्याचं समर्थन करताना दिसतो.

'तो' आमचा हिरो आहे : सोनू सूदनं त्याच्या पोस्टमध्ये लिहिलंय, आपण प्रत्येक खेळाडूचा आदर केला पाहिजे. ज्या खेळाडूनं आपल्याला आणि आपल्या देशाला अभिमान वाटावा असं काम केलंय. त्याचं खेळाडूचा तुम्ही एक दिवस जयजयकार करता, तर दुसऱ्या दिवशी त्या खेळाडूला तुम्ही टार्गेट करता. त्यामुळं खेळाडू वाईट नसून आम्ही वाईट आहोत. मला क्रिकेट आवडतं आणि माझ्या देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रत्येक खेळाडूचा मी आदर करतो, मग तो कोणत्या संघासाठी खेळत असो, तो कर्णधार असो किंवा संघाचा 15वा खेळाडू असो, त्यानं काही फरक पडत नाही. तो आमचा हिरो आहे, असं सोनू सूद यांनी म्हटलंय.

चाहते पांड्यावर नाराज : स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याकडं मुंबई इंडियन्सचं (MI) कर्णधारपद सोपवण्यात आल्यापासून त्याला क्रिकेट चाहत्यांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या 17 व्या हंगामापूर्वी, हार्दिकचा MI नं आपल्या संघात समावेश केला होता. एवढंच नाही, तर त्याला कर्णधारही बनवण्यात आलं. हार्दिकनं रोहित शर्माकडून कर्णधारपद घेतल्यानं क्रिकेट चाहते नाराज आहेत. त्यामुळंच ते हार्दिकवर सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका करत आहेत. यासंदर्भात अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. ज्यामध्ये चाहत्यांनी अष्टपैलू खेळाडूचा अपमान केला आहे. गुजरात टायटन्स (GT) तसंच मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. हार्दिक पहिल्यांदाच मुंबईचं नेतृत्व करत होता. त्यामुळं दोन्ही संघांचे चाहते त्याच्यावर नाराज होते, त्यामुळं त्याला दोन्हीकडून टीकेला सामोरं जावं लागलं.

हे वाचलंत का :

  1. आसामच्या रियान परागच्या दमदार खेळीनं राजस्थानचा सलग दुसरा विजय; विजयापासून 'दिल्ली' दुरच - RR vs DC
  2. आठव्या सामन्याचा 'आठवावा प्रताप'! 1 सामना, 7 विक्रम अन् 523 धावा...; हैदराबाद-मुंबई सामन्यात षटकार चौकारांनी गोलंदाजांचा 'अभिषेक' - IPL 2024 SRH vs MI
  3. चेन्नईत ऋतुचा 'राज'; गुजरात विरुद्ध चेन्नईची विजयी हॅट्रीक, हंगामातील दुसरा विजय - CSK vs GT

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.