चंदीगड- सिद्धू मूसेवालाचे वडील बलकौर सिंग यांनी व्हिडिओमधून पंजाब सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ईश्वराच्या कृपेमुळे शुभदीप आमच्या कुटुंबात पुन्हा परतला. त्यामुळे आनंदी होतो. मात्र, मुलाचं पालकत्व असल्याची सत्य कागदपत्रे दाखविण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या आहेत. आम्ही प्रशासनाला विशेषत: मुख्यमंत्री भगवंत मान यांना विनंतो करतो की, त्यांनी पूर्ण उपचार होऊ द्यावे. मी पंजाबमध्ये राहतो. जेव्हा गरज भासेल तेव्हा येतो. पण, सध्या आम्हाला प्राधान्यानं उपचार करू द्यावे.
बलकौर सिंग म्हणाले, "मुलानं २८ वर्षे कायद्याचं पालन केलं आहे. माझी सैन्यदलाची पार्श्वभूमी असल्यानं कायद्याचा आदर करतो. कोणताही कायदेशीर तपास करण्यासाठी मी पूर्ण सहकार्य करणार आहे. जर मी कायद्याचं उल्लंघन केल्याचं वाटत असेल तर तुम्ही मला अटक करा. जर तुम्हाला संशय असेल तर तुम्ही आरोपपत्र दाखल करून तुरुंगात टाका. तुम्ही तपास करा. तुम्हाला खात्री देतो, माझ्याकडं सर्व कायदेशीर कागदपत्रे आहेत. त्यामधून सत्य समोर येईल."
तुमचा निर्लज्जपणाचा कळस- मूसेवालाच्या पित्यानं सरकारवर आरोप केल्यानं पंजाबमध्ये राजकीय भूकंप झाला. पंजाबमधील विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रताप सिंग बाजवा यांनी मुख्यमंत्री यशवंत मान यांना पत्र लिहून संताप व्यक्त केला. त्यांनी पत्रात म्हटले, भगवंत मान हा तुमचा निर्लज्जपणाचा कळस आहे! मुलाच्या जन्मानंतर पंजाबसह जगभरातील लोक आनंद व्यक्त करत आहेत. मुलगा जन्मल्यानं तुम्हाला कशाची भीती आहे? तुम्हाला सरदार बलकौर सिंग आणि त्यांच्या कुटुंबाकडून कसली भीती वाटत आहे?
कायदेशीर अडथळ्यांनी अडचणी आणण्याचा प्रयत्न- पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा यांनीदेखील मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली. त्यांनी पत्रात म्हटले, "भगवंत मानजी, बलकौर सिद्धू यांचं अभिनंदन न करणारे तुम्ही एकमेवर व्यक्ती आहात. उलट तुमचे प्रशासन कायदेशीर अडथळ्यांनी त्यांना अडचणीत आणत आहेत. कृपया सिद्धू यांच्या कुटुंबाला त्रास देणं थांबवा. त्यांना परत सुखानं राहू द्या. भाजपा प्रवक्ते आर. पी. सिंग यांनी म्हटले, "सिद्धू मूसेवालाच्या पित्यानं केलेल्या विधानानं आम्हाला आश्चर्य वाटलं आहे.
हेही वाचा-