नवी दिल्ली Swapnil Kusale : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पुरुषांच्या 50m 3P स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्यानंतर, भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळेनं आपलं पदक राष्ट्राला समर्पित केलंय. भारताची 21 जणांची सर्वात मोठी नेमबाजी तुकडी सद्या पॅरिसमध्ये आहे. नेमबाज मनू भाकेर, सरबज्योत सिंग तसंच कुसाळे यांनी देशासाठी तिसरे पदक मिळवून दिलं. ऑलिम्पिकच्या इतिहासातील भारतासाठी ही नेमबाजीत सर्वोत्तम संख्या आहे. कुसाळेनं पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3P प्रकारात एकूण 451.4 गुणांसह कांस्यपदक मिळवलं. ऐतिहासिक विजयानंतर त्यानं आपलं यश संपूर्ण देशाला, तसंच त्याचं कुटुंबाला समर्पित केलं.
"सर्वप्रथम, मी मनू तसंच सरबजोत यांचं अभिनंदन करू इच्छितो. कारण त्यांनी यावेळी भारतासाठी नेमबाजीत पदक जिंकून देण्याची सुरुवात केली. ऑलिम्पिक पदक जिंकणं, हे प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं. मी इतकी वर्षे कठोर परिश्रम केल्यानंतर आज इथ पोहचलोय. यानंतरही मी कठोर परिश्रम करून पुढील ऑलिम्पिकमध्ये देशाचा गौरव वाढवले. मला माझा विजय देशाला समर्पित करायचा आहे" - स्वप्नील कुसाळे, कांस्यपदक विजेता
टार्गेटवर लक्ष केंद्रित : अंतिम फेरीच्या सुरुवातीच्या टप्प्यात कुसाळेनं सर्वाधिक वेळ सहाव्या स्थानावर घालवला. त्यानं सातत्यानं 10 शॉट मारत हळूहळू पदकापर्यंत मजल मारली. कुसाळेनं खुलासा सांगितलं की, त्यानं स्कोअरबोर्डकडं पाहिलं नाही. खेळत असताना त्यानं स्वतःला शांत ठेवण्यावर लक्ष केंद्रित केलं. "मी स्कोअरबोर्डकडे पाहिलं नाही. मी फक्त माझं लक्ष टार्गेटवर केंद्रित केलं. मी माझ्या श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रित केलं. मला माझे शरीर शांत ठेवायचं होतं. यावेळी नेमबाजांनी चांगली कामगिरी केली", असं कुसाळेनं म्हटलंय.
सर्वांचे मानले आभार : तसंच कुसाळेनं नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे दिखील आभार मानले. पुढं बोलताना तो म्हणाला "यावेळी आम्ही सुरुवात केली आहे, पण आता आम्ही थांबणार नाही. भारतीय नेमबाजीसाठी प्रत्येकानं पाठिंबा दिला आहे. अगदी फेडरेशन तसंच 'साई' कुटुंबीय, खेळाडू, सपोर्ट स्टाफ अशा सर्वांनी शूटिंग टीमला पाठिंबा दिला आहे. क्रीडापटूंसाठी अनेकांनी कठोर परिश्रम घेतल्याचं तो म्हणाला.
अडचणीवर मात करून रचला इतिहास : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कुसाळेनं अडचणींवर मात करून इतिहास रचल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. व्यासपीठावर उभे राहून भारताचा ध्वज हवेत उंच उंचावताना मला अभिमान वाटला. जणू आपण भारताचं नाव उंचावलं आहे, असं त्यावेळी मला वाटत होतं. "माझ्या लहानपणी माझ्या वडिलांनी मला क्रीडा प्रबोधिनीमध्ये ठेवलं होतं. ही महाराष्ट्र सरकारची योजना होती. त्यामुळं मी शूटिंगमध्ये आलो. महाराष्ट्र सरकारनं मला पाठिंबा दिला. त्यानंतर मी सहा वर्षे शूटिंग केलं. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांनंतर, शूटिंगमध्ये माझी आवड वाढली. कारण मला नेमबाजीची आवड आहे. त्यामुळं जेव्हा मी रेंजवर जातो तेव्हा मी नेमबाजीचा आनंद घेतो.
नेमबाजीत भारताची सर्वोत्तम कामगिरी : कुसाळेच्या प्रयत्नामुळं नेमबाजीतील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी असल्याचं सुनिश्चित झालं. याआधी या खेळातील भारताची सर्वोत्तम कामगिरी 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये झाली होती. त्यावेळी विजय कुमारनं पुरुषांच्या २५ मीटर रॅपिड-फायर पिस्तूल स्पर्धेत रौप्यपदक तसंच पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफल स्पर्धेत गगन नारंगला कांस्यपदक मिळालं होतं. 2004च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवून पुरुषांच्या दुहेरी ट्रॅप नेमबाजीत राज्यवर्धन सिंग राठोडनं भारताला पहिलं नेमबाजीत पदक मिळवूण दिलं होतं. त्यानंतर बीजिंग ऑलिम्पिकमध्ये अभिनव बिंद्रानं पुरुषांच्या 10 मीटर एअर रायफलमध्ये ऐतिहासिक सुवर्णपदक पटकवलं होतं. जे देशाचं पहिले वैयक्तिक सुवर्णपदक होतं.
'हे' वचालंत का :
- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणाऱ्या स्वप्नीलच्या गावात दिवाळी; मायदेशी परतल्यानंतर 'असं' होणार स्वागत - paris olympics 2024
- ऑलिम्पिकमध्ये 72 वर्षांनी महाराष्ट्राचा डंका वाजवणाऱ्या स्वप्नीलला मुख्यमंत्र्यांकडून मोठं बक्षीस - Paris Olympics 2024
- "कांस्य पदकाचा वेध घेणारा स्वप्नील महाराष्ट्राचा अभिमान", मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसह राजकीय नेत्यांनी केलं अभिनंदन - Swapnil Kusale