ETV Bharat / bharat

मध्यप्रदेशात मातीचं शिवलिंग बनवताना कोसळली भिंत; नऊ चिमुकल्यांचा ढिगाऱयाखाली दबून मृत्यू - Wall Collapse in Madhya Pradesh

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 4, 2024, 1:02 PM IST

Updated : Aug 4, 2024, 1:55 PM IST

Wall Collapse in Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील सागर जिल्ह्यातील शाहपूरमध्ये भिंत कोसळून नऊ लहान मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सरकारकडून मृत मुलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाखांची मदत जाहीर करण्यात आली.

Wall Collapse in Madhya Pradesh
मध्यप्रदेशात भिंत कोसळून मुलांचा मृत्यू (ETV Bharat Reporter)

सागर (मध्यप्रदेश) Wall Collapse in Madhya Pradesh : सागर जिल्ह्यातील शाहपूर येथे भीषण दुर्घटना घडली. मातीचं शिवलिंग बनवताना मंदिर परिसराची भिंत कोसळली. या दुर्घटनेत नऊ मुलांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. मुख्यमंत्री मोहन यादव (CM Mohan Yadav) यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली.

शिवलिंग बनवताना कोसळली मातीची भिंत : मातीचं शिवलिंग बनवण्यासाठी अनेक लहान मुलं एकत्र जमली होती. त्यानंतर मातीची भिंत कोसळून त्याखाली मुलं गाडले गेले. स्थानिक आमदार आणि माजी मंत्री गोपाल भार्गव घटनास्थळी पोहोचले असून, मदत कार्य करत आहेत. तर दुर्घटनेत जखमी मुलांना सागर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

आर्थिक मदत जाहीर : मुख्यमंत्री मोहन यादव यांनी आपल्या 'एक्स' अकाऊंटवर पोस्ट केलं की, "आज सागर जिल्ह्यातील शाहपूरमध्ये मुसळधार पावसामुळं भिंत कोसळून 9 निष्पाप मुलांचा मृत्यू झाल्याची बातमी ऐकून दुःख झालं. जखमी मुलांवर योग्य उपचार करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. मृत बालकांच्या आत्म्यास शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. या दुर्घटनेत जखमी झालेल्या इतर मुलांची प्रकृती लवकरात लवकर बरी व्हावी, अशी माझी प्रार्थना आहे. ज्या कुटुंबांनी आपली मुलं गमावली आहेत, त्यांच्याबद्दल माझ्या मनापासून संवेदना. मृत मुलांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी 4 लाखांची मदत दिली जाणार आहे."

शिवलिंग बनवलं जात होतं : याबाबत शहापूर नगर येथील स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील कुटी मंदिराजवळ शिवलिंग उभारणीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज रविवारी असल्यामुळं अनेक मुले शिवलिंग बांधण्यासाठी आली होती. मंदिराजवळील मातीच्या भिंतीला आधार देऊन शिवलिंग बनवत होते. त्यानंतर नऊ वाजण्याच्या सुमारास मातीची मोठी भिंत कोसळून सर्व मुले त्याखाली गाडली गेली. घटनास्थळी उपस्थित लोकांनी अथक परिश्रम करून मुलांना वाचवले. मात्र, यात नऊ मुलांचा मृत्यू झाला. रविवार असल्यानं डॉक्टर स्थानिक उपआरोग्य केंद्रात पोहोचले नसल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळं मुलांना तातडीने उपचार मिळू शकले नाहीत आणि जखमी मुलांचा मृत्यू झाला, असा आरोप आहे.

माजी मंत्री गोपाल भार्गव घटनास्थळी दाखल : या घटनेची माहिती मिळताच स्थानिक आमदार आणि माजी मंत्री गोपाल भार्गव यांनी तातडीनं शाहपूर गाठून घटनेचा आढावा घेतला. दुर्घटनेतील जखमी आणि मृत मुलांना तातडीने सागर जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले. स्थानिक प्रशासन आणि पोलीस अजूनही मदतकार्यात गुंतले आहेत. घटनेची माहिती मिळताच जिल्हास्तरीय अधिकारीही जिल्हा रुग्णालयात पोहोचले.

हेही वाचा -

केदारनाथ भूस्खलन प्रकरण : आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू तर 9099 भाविकांचं रेस्क्यू; सैन्य दलानं संभाळली बचावकार्याची कमान - Kedarnath Rescue Operation

वायनाडमध्ये आतापर्यंत 300 हून अधिक लोकांचा मृत्यू, बेपत्ता नागरिकांचा रडारच्या मदतीने शोध - Wayanad Landslides

Last Updated : Aug 4, 2024, 1:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.