भरतपूर Seven youths Drowned : राजस्थानमधील भरतपूर जिल्ह्यातील बयाना पोलीस स्टेशन परिसरात बाणगंगा नदीत सात तरुणांचा बुडून मृत्यू झालाय. या सर्वांचं वय 18 ते 22 वर्षे दरम्यान आहे. या घटनेत नागला होट्टामधील पवन पवन (15), सौरभ सिंग (16), भूपेंद्र (18), शंतनू (18), लाखी (18) गौरव (16) सुगड सिंग (22) यांचा मृत्यू झाला आहे, असं हेड कॉन्स्टेबल धरमवीर यांनी सांगितलं. गावकऱ्यांनी तासाभराच्या बचावानंतर मृतदेह बाहेर काढले आहेत. नदीमधून गाळ काढल्यानं मोठे खड्डे तयार झाले आहेत.
सातही जणांचा मृत्यू : बाणगंगा नदीचा प्रवाह पाहणारे काही तरुण अचानक खाली कोसळले. यामुळं सातही तरुणांचा मृत्यू झाला. नदीतील पाण्याचा प्रवाहही जास्त होता. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी ग्रामस्थांची एकच गर्दी झाली. माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी पोहोचले. सात तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी गावातील काही तरुण नागला होट्टा गावातील बाणगंगा नदीचा प्रवाह पाहत होते. यावेळी नदीचा कड खचल्यानं युवक खाली कोसळले. त्यामुळं घटनास्थळी एकच खळबळ उडाली. पाण्याचा प्रवाह पाहण्यासाठी इतर उपस्थित असलेल्या लोकांनी तरुणांना बाहेर काढण्यासाठी तातडीनं मदतकार्य सुरू केलं. तसंच घटनेची माहिती पोलिसांना दिली.
- एसडीआरएफची टीम घटनास्थळी : अपघाताची माहिती मिळताच जिल्हाधिकारी डॉ. अमित यादव यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर एसडीआरएफची टीमही दाखल झाली. मदतकार्य करत असताना सात तरुणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. येथून दोन तरुणांचे मृतदेह भरतपूर जिल्हा रुग्णालयाच्या शवागारात नेण्यात आले.
- सतर्कतेचा इशारा : गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं बाणगंगा नदीला पूर आला आहे. त्यामुळं जिल्हा प्रशासनानं भागातील ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा दिलाय. तरी देखील ग्रामस्थ पूर पाहण्यासाठी नदी किनारी जात आहेत. या घटनेनंतर मृताच्या नातेवाइकांनी एकच आक्रोश केलाय.