नवी दिल्ली- मूळची पाकिस्तानी असलेली सीमा हैदर ही भारतीय तरुणाबरोबरील विवाहामुळे सतत चर्चेत असते. ती सध्या सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे. या व्हिडिओत सीमा हैदर जखमी झाल्याचं दिसत आहे. चेहऱ्यावर आणि हातावर जखमा झाल्याचं सीमा कथित व्हिडिओमधून दाखवित आहे. त्या कथित व्हिडिओवरून सीमा हैदरला भारतीय पती सचिनकडून मारहाण झाल्याचा दावा करण्यात येत आहे. प्रत्यक्षात सत्य वेगळेच आहे.
सीमा हैदरच्या कथित व्हायरल व्हिडिओमध्ये तिच्या शरीरावर जखमा दिसत आहेत. ती रडताना दिसत आहे. या व्हायरल व्हिडिओबाबत सीमा हैदरचे वकील ए. पी. सिंह यांनी भूमिका स्पष्ट केली. ए. पी. सिंह म्हणाले, पाकिस्तानकडून एआयचा वापर सुरू आहे. त्या व्हायरल व्हिडिओबाबत सीमाचा काहीही संबंध नाही. व्हायरल व्हिडिओमधून भ्रम निर्माण करण्यात येत आहे. सोशल मीडियातील व्हिडिओमधून चुकीच्या पद्धतीनं माहिती पसरविली जात आहे. त्यामागे पाकिस्तानचे काही चॅनेल आणि युट्युबर आहेत. सीमा आणि सचिन यांच्यात कोणताही वाद नाही. दोघांचे एकमेकांवर खूप प्रेम आहे. त्यामुळे कोणताही वाद होण्याची शक्यता नाही. व्हिडिओमधून सचिन आणि सीमा हैदर यांच्यातील नाते बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
सीमा हैदरच्या पतीची न्यायालयात याचिका- दुसरीकडं सीमा हैदरचा पूर्वाश्रमीचा पति गुलाम हैदरनं मुलांचा ताबा घेण्याकरिता थेट कायदेशीर मार्ग स्वीकारला आहे. गुलामनं भारतीय वकिलामार्फत ग्रेट नोएडा येथील सूरजपूर न्यायालयात याचिका दाखल केली. या याचिकेतून सीमा हैदर आणि सचिन यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्याचबरोबर सीमा हैदर आणि सचिन यांना दोघांवर प्रत्येकी तीन कोटींची मानहानीची नोटीसदेखील पाठविली आहे. तर सीमाची सातत्यानं बाजू मांडणारे वकील ए. पी. सिंह यांच्यावर पाच कोटींचा मानहानीचा दावा केला आहे. गुलाम याच्या याचिकेवर न्यायालयानं पोलिसांना नोटीस बजावित १८ एप्रिलपर्यंत बाजू मांडण्यासाठी वेळ दिला आहे.
काय आहे सीमा हैदर आणि सचिन यांचे प्रेमप्रकरण- पाकिस्तानमधील कराचीत राहणाऱ्या सीम हैदरचं नोएडा येथे राहणाऱ्या सचिन मीणाबरोबर पब्जी खेळताना ऑनलाईन संवाद व्हायचा. त्याचे हळूहळू प्रेमात रुपांतरण झाले. सचिनबरोबर विवाह करण्यासाठी सीमा हैदर ही तीन मुलांसोबत भारतात पोहोचली. त्यासाठी तिने बेकायदेशीरपणे नेपाळमधून भारतात प्रवेश केला. पाकिस्तानी विवाहित महिलेचे भारतीय तरुणाबरोबर झालेल्या प्रेमसंबंधाची समाज माध्यमात खूप चर्चा झाली. त्यानंतर बेकायदेशीरपणे राहत असलेल्या सीमा हैदरची आणि तिच्या पतीला पोलिसांनी अटक केली. दोघांची चौकशी करून त्यांना न्यायालयात हजर केलं. न्यायालयानं जामिन देल्यानंतर दोघांची मुक्तता केली. सध्या दोघेही ग्रेटर नोएडामध्ये एकत्रित राहतात.
Disclaimer- व्हायरल व्हिडिओच्या सत्यतेबाबत ईटीव्ही भारत कोणताही दावा करत नाही.
हेही वाचा-