नवी दिल्ली SC Rejects Plea Replacement Of EVM : लोकसभेच्या निवडणुका शनिवारी (16 मार्च) जाहीर होणार आहेत. मतदानासाठी वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएमवर (EVM) अनेकवेळा प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. त्याविरोधात अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. ईव्हीएमविरोधात नुकतीच एक याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली होती. ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळं आता आगामी लोकसभा निवडणूक 'ईव्हीएम' वरच होणार हे स्पष्ट झालंय.
आम्ही किती याचिकांवर विचार करावा? : सुनावणीवेळी न्यायमूर्ती संजीव खन्ना, दीपंकर दत्ता आणि ऑगस्टिन जॉर्ज मसिह यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं सांगितलं की, न्यायालयानं यापूर्वीच ईव्हीएमच्या कार्यप्रणालीशी संबंधित अनेक याचिका हाताळल्या आहेत. आम्ही किती याचिकांवर विचार करावा? अलीकडेच, आम्ही VVPAT शी संबंधित याचिका हाताळली आहे." तसंच कलम 32 अंतर्गत याचा विचार करू शकत नाही, असंही खंडपीठानं यावेळी स्पष्ट केलं.
याचिकेत काय म्हटलंय? : नंदिनी शर्मा यांनी ही याचिका दाखल केली होती. याचिकेत भारत निवडणूक आयोग आणि सहा राजकीय पक्षांची बाजू मांडण्यात आली होती. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरचा वापर करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही या याचिकेच्या माध्यमातून करण्यात आली होती.
अनेक याचिकांवर सुनावणी : 'ईव्हीएम'विरोधातील अनेक याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात याआधीही सुनावणी केल्या आहेत. एकाही याचिकाकर्त्याला ईव्हीएममध्ये दोष असल्याचं सिद्ध करता आलं नाही. असं असताना सर्वोच्च न्यायालय आणखी किती वेळा या एकाच विषयावर सुनावणी घेणार आहे, अशा शब्दांत सर्वोच्च न्यायालयानं ईव्हीएमविरोधातील याचिका फेटाळून लावली आहे.
हेही वाचा -