बेळगाव : बेळगावच्या नूतन महापौर पदावर सविता कांबळे यांची बिनविरोध निवड झाली असून, उपमहापौर पदावर आनंद चौहान यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी शहरातील महापालिका कार्यालयाच्या सभागृहात प्रादेशिक आयुक्त संजय शेटेण्णा यांच्या नेतृत्वाखाली महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक पार पडली. तब्बल 5 वर्षानंतर बेळगाव शहराला कन्नड भाषिक महापौर मिळाले आहे.
"मला संधी दिल्याबद्दल मी बेळगावच्या जनतेची ऋणी आहे. मी फक्त विकासकामांवरच बोलणार आहे. मी एक कष्टकरी महिला आहे. माझी महापौरपदी नियुक्ती झाल्याचा मला अभिमान वाटतो. मी नागरिकांचे काम करणार आहे. सर्वांच्या सहकार्यानं बेळगाव शहराच्या विकास कामांना गती देईन".- सविता कांबळे, महापौर
सविता कांबळेंनी केलं विविध कंपन्यात काम : बसवराज चिकलादिन्नी 2018-19 मध्ये बेळगाच्या महापालिकेवर निवडून आले होते. महापौर पदावर सविता कांबळे यांची २२व्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. भाजपाच्या पहिल्या कन्नड भाषिक महापौर होण्याचं श्रेयही सविता कांबळे यांना जातंय. भाजपाच्या अन्य उमेदवार लक्ष्मी राठोड यांनी उमेदवारी मागं घेतल्यानं प्रादेशिक आयुक्त संजय शेटेण्णावर यांनी महापौर पदावर सविता कांबळे यांच्या नावाची घोषणा केली. याआधी सविता कांबळे यांनी विविध कंपन्यांमध्ये मजूर म्हणूनही काम केलं आहे. त्यांनी भाजपात प्रवेश करत महापौर पदापर्यंत मजल मारली आहे.
बेळगावच्या उपनगराध्यक्षपदी भाषकाची बाजी : बेळगावच्या उपमहापौर पदावर भाजपाचे आनंद चौहान यांची निवड झाली आहे. काँग्रेसच्या ज्योती कडोलकर यांच्या विरोधात ते 19 मतांनी विजयी झाले आहेत. चौहान यांना 39 तर काँग्रेसच्या ज्योती कडोलकर यांना 20 मते मिळाली. बेळगावच्या उपमहापौर पदावर दुसऱ्यांदा मराठी भाषकाची बाजी मारली.
निवडणुकींच्या तोंडावर कन्नड- मराठी भाषिक कार्ड : लोकसभा निवडणुका तोंडावर आल्या असून, कन्नड तसंच मराठा समाजाचं मत पदरात पाडण्यासाठी भाजपानं मराठी कन्नड कार्ड खेळलं आहे. भाजपानं कन्नड भाषिक असलेल्या सविता कांबळे यांना महापौर पदाकरिता संधी दिली आहे. तसंच मराठा भाषिक उपमहापौर पदी आनंद चव्हाण यांना यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी भाजपा खासदार मंगला अंगडी, आमदार अभय पाटील, माजी मंत्री मुरुगेशा निरानी, माजी आमदार अनिल बेनाके यांची उपस्थिती होती.
हे वाचलंत का :