हैदराबाद : देशभरात आज 75 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला. यानिमित्त राजधानी दिल्लीच्या कर्तव्यपथावर भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. दरवर्षीप्रमाणे, यंदाही तिन्ही दलांच्या सैनिकांनी चित्तथरारक कवायती आणि शक्तिप्रदर्शन केलं. यासह विविध राज्यांतील चित्ररथांचंही प्रदर्शन करण्यात आलं होतं.
सुरक्षा जवानांकडून सलामी : आज हैदराबादच्या जगप्रसिद्ध रामोजी फिल्म सिटी येथे 75 वा प्रजासत्ताक दिन सोहळा पार पडला. रामोजी फिल्म सिटीच्या व्यवस्थापकीय संचालक विजयेश्वरी यांनी राष्ट्रध्वजाचं अनावरण केलं. त्यानंतर त्यांना सुरक्षा जवानांकडून सलामी देण्यात आली. या कार्यक्रमात रामोजी फिल्म सिटीचे मानव संसाधन अध्यक्ष गोपाल राव, UKML (उषाकिरण मूव्ही लिमिटेड) संचालक शिवरामकृष्ण, प्रसिद्धी उपाध्यक्ष ए.व्ही. राव, फलोत्पादन उपाध्यक्ष रवी चंद्रशेखर आणि संस्थेचे इतर उच्च अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. फिल्मसिटीचे सीईओ शेषसाई यांनी एमडी विजेश्वरी यांचं स्वागत केलं.
रामोजी ग्रुपच्या कंपन्यांचे कर्मचारीही सहभागी : या सोहळ्याला रामोजी ग्रुपच्या कंपन्यांचे कर्मचारीही सहभागी झाले होते. ध्वजारोहण केल्यानंतर अनेकांनी राष्ट्रध्वजासह सेल्फी काढल्या. यावेळी सर्वांच्या मनात देशभक्ती उफाळून आलेली दिसत होती. रामोजी फिल्म सिटीत दरवर्षी स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताक दिनाचे सोहळे थाटमाटात आयोजित केले जातात. या सोहळ्यांमध्ये फिल्मसिटी व्यवस्थापन आणि कर्मचारी मोठ्या उत्साहात सहभागी होतात.
'रामोजी फिल्म सिटी' वन स्टॉप सोल्युशन : हैदराबादमधील 'रामोजी फिल्म सिटी' एक प्रसिद्ध हॉलिडे डेस्टिनेशन आहे. येथील दैनंदिन लाइव्ह शो, राइड्स, थीम पार्क आणि गेम्स पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असतात. येथे तुम्हाला प्रत्येक बजेटला अनुरूप ऑफर्स मिळतात. या सोबतच सुट्ट्या एंजॉय करण्यासाठी आणि भव्यदिव्य अशा विवाहसोहळ्यांसाठी हे ठिकाण लोकप्रिय आहे.
हे वाचलंत का :