ETV Bharat / bharat

प्रजासत्ताक दिन 2024; ध्वज फडकवणे आणि ध्वजारोहण यात काय आहे फरक ? - Republic Day 2024

Republic Day 2024 : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी प्रजासत्ताक दिन साजरा करण्याच्या तयारीला सुरूवात झाली आहे. झेंडा फडकवण्याचे देखील काही नियम असतात. स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण केलं जातं. तर प्रजासत्ताक दिनी तिरंगा फडकवला जातो? पद्धती आणि नियम जाणून घ्या.

Republic Day 2024
प्रजासत्ताक दिन 2024 (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 24, 2024, 11:27 AM IST

Updated : Aug 14, 2024, 10:25 AM IST

हैदराबाद Republic Day 2024: देशाचा राष्ट्रध्वज हा सन्मान आणि अभिमानाचे प्रतीक आहे. दरवर्षी स्वातंत्र्य दिन (15 ऑगस्ट) आणि प्रजासत्ताक दिन (26 जानेवारी) रोजी ध्वज फडकवला जातो, परंतु तुम्हाला माहिती आहे का की स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज फडकावण्यात काही फरक आहेत. ध्वज दोन प्रकारे फडकवले जातात. एकाला ध्वजारोहण आणि दुसऱ्याला ध्वज फडकवणं म्हणतात.

ध्वज फडकवणे आणि ध्वजारोहण यात फरक काय ? ध्वज फडकवणे आणि ध्वजारोहण यात खूप फरक आहे हे फार कमी लोकांना माहीत असेल. वास्तविक, 26 जानेवारी म्हणजेच प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रध्वज शीर्षस्थानी बांधला जातो आणि तेथून ध्वज फडकवला जातो, याला ध्वज फडकवणे म्हणतात. जर आपण स्वातंत्र्य दिनाबद्दल बोललो तर 15 ऑगस्ट रोजी राष्ट्रध्वज वर खेचला जातो आणि नंतर फडकवला जातो, याला ध्वजारोहण म्हणतात. कारण जेव्हा आपल्या देशाला ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटिश सरकारचा ध्वज उतरवून भारताचा ध्वज फडकवण्यात आला होता. यामुळेच 15 ऑगस्टला तिरंगा वर खेचून फडकवला जातो.

  • दोन्ही दिवशी स्वतंत्रपणे कार्यक्रम : दोन्ही दिवशी पंतप्रधान आणि राष्ट्रपती स्वतंत्रपणे ध्वज फडकवतात. स्वातंत्र्य दिनानिमित्त (15 ऑगस्ट), पंतप्रधान कार्यक्रमात सहभागी होतात आणि ध्वजारोहण करतात. प्रजासत्ताक दिनी देशाचे राष्ट्रपती 26 जानेवारी रोजी मुख्य कार्यक्रमात सहभागी होतात. त्यानंतर ध्वजवंदन करतात.
  • जागेतही फरक : स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या दिवशी पंतप्रधान ध्वजारोहण करतात. त्याचवेळी राजपथावर प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम होतो. या दिवशी राष्ट्रपती ध्वज फडकवतात.
  • 26 जानेवारीला राष्ट्रपतीच का करतात ध्वजवंदन ? पंतप्रधान हे देशाचे राजकीय प्रमुख असतात तर राष्ट्रपती हे घटनात्मक प्रमुख असतात. 26 जानेवारी 1950 रोजी देशाची राज्यघटना लागू झाली. याआधी देशात कोणतेही संविधान किंवा राष्ट्रपती नव्हते. या कारणास्तव राष्ट्रपती दरवर्षी 26 जानेवारीला ध्वजवंदन करतात.

हेही वाचा :

  1. मराठा आरक्षण: मनोज जरांगे यांचं 'भगवं वादळ' आज लोणावळ्यात, प्रशासकीय यंत्रणा सज्ज
  2. भारत न्याय यात्रेत राहुल गांधींसह 'या' नेत्यांवर गुन्हा दाखल, काँग्रेसचा भाजपावर हल्लाबोल

Last Updated : Aug 14, 2024, 10:25 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.