ETV Bharat / bharat

बलात्कार पीडितेची आत्महत्या: गावातीलच नराधमानं अत्याचार केल्याच्या धक्क्यातून पीडितेनं घेतलं जाळून - Rape Victim Dies By Suicide - RAPE VICTIM DIES BY SUICIDE

Rape Victim Dies By Suicide : गावातीलच नराधमानं बलात्कार केल्याच्या धक्क्यानं पीडितेनं जाळून घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी नराधमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Rape Victim Dies By Suicide
संग्रहित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 14, 2024, 2:02 PM IST

जयपूर Rape Victim Dies By Suicide : नराधमानं अत्याचार केल्याचा धक्का सहन न झाल्यानं बलात्कार पीडितेनं आत्महत्या केल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना राजस्थानमधील कोटा इथ घडली. या पीडितेला नराधमानं गुरुवारी फरार करुन एका खोलीत नेऊन अत्याचार केल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबानं केला. त्यामुळे अत्याचाराच्या धक्क्यानं या पीडितेनं जाळून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. तिला तत्काळ एमबीएस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. या प्रकरणी बलात्कारी नराधमावर गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलीस निरीक्षक भंवर सिंह गुर्जर यांनी दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक शिवम जोशी यांनीही घटनास्थळी धाव घेतली.

तरुणीला घेऊन नराधम झाला होता फरार : या घटनेतील पीडितेला गावातील नराधम घेऊन फरार झाला होता. त्यानंतर त्यानं एका खोलीत नेऊन पीडितेवर बलात्कार केला. यावेळी त्याचा भाऊ रस्त्यावर पहारा देत असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केला. त्यामुळे पीडित तरुणीनं बलात्काराच्या धक्क्यातून आत्महत्या केली. ही घटना समजताच तिच्या कुटुंबीयांनी तिला एसबीएस रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान पीडितेचा मृत्यू झाला.

गुरुवारी रात्री घडली घटना : कोटा जिल्ह्यातील इटावा इथल्या बुढादीत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गावात ही तरुणी कुटुंबीयांसह राहते. गुरुवारी रात्री तिचं कुटुंब झोपलं असता, ती दिसून आली नाही. त्यामुळे पीडितेला शोधण्यात आलं. मात्र गावातीलच एका नराधमानं तिच्यावर बलात्कार केल्याची माहिती पुढं आली, अशी माहिती तिच्या कुटुंबीयांनी दिली. याबाबत पोलीस निरीक्षक भंवर सिंह गुर्जर यांनी माहिती दिली. ते म्हणाले, की "जाळून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तिच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरुन या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या आरोपीची शोधमोहीम सुरू आहे." घटनेची माहिती मिळताच पोलीस उपाधीक्षक शिवम जोशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा :

  1. बलात्काराच्या गुन्ह्यात नेहमी पुरुषच दोषी नसतो; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय, आरोपीला केलं दोषमुक्त - Men Are Not Always At Fault
  2. सोशल माध्यमांवरील प्रेमातून लव्ह, प्यार और धोका; तरुणीवर बलात्कार करुन ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमाला ठोकल्या बेड्या - Girl Rape And Blackmail In Thane
  3. लग्नाचे आमिष दाखवून मावस बहिणीवर बलात्कार; तब्बल आठ वर्षानंतर मिळाला न्याय, भावाला १० वर्षांची शिक्षा - Sister Rape Case

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.