ETV Bharat / bharat

"तरुणांनी रामोजी राव यांची प्रेरणा घेऊन देशाला बलशाली करावं"; माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचं आवाहन - Venkaiah Naidu On Ramoji Rao

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 18, 2024, 1:55 PM IST

Updated : Jul 18, 2024, 2:44 PM IST

Venkaiah Naidu On Ramoji Rao : दिवंगत पद्मविभूषण रामोजी राव यांनी जीवनभर पत्रकारिता मुल्यं जपली. 'पद्मविभूषण' रामोजी राव यांच्यासारख्या समाजावर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या महान व्यक्तीची इतिहासात नोंद होणं आवश्यक आहे. त्यामुळे 'पद्मविभूषण' रामोजी राव यांच्यावर पुस्तक प्रकाशित करण्यात यावं, असं प्रतिपादन माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं.

Venkaiah Naidu On Ramoji Rao
माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू (ETV Bharat)

हैदराबाद Venkaiah Naidu On Ramoji Rao : तरुणांनी 'पद्मविभूषण' रामोजी राव यांच्या जीवनातून प्रेरणा घेऊन देशाला बलशाली करावं, असं प्रतिपादन माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी केलं. बुधवारी सिकंदराबादमधील इम्पीरियल गार्डन येथे ब्रह्माकुमारींनी आयोजित केलेल्या स्मृती सेवेत माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी सहभागी होऊन दिवंगत 'पद्मविभूषण' रामोजी राव यांना आदरांजली वाहिली. यावेळी ईनाडूचे संचालक सी किरण, मार्गदर्शीच्या संचालक शैलजा, रामोजी फिल्म सिटीच्या संचालक विजयेश्वरी, आदींसह त्यांच्या कुटुंबातील सदस्य, चित्रपट कलाकार सुमन आणि श्रीकांत, ब्रह्माकुमारींचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

रामोजी राव यांनी केलं पत्रकारितेतील मूल्यांचं पालन : यावेळी बोलताना, '' 'पद्मविभूषण' रामोजी राव यांचे समाजावर, विशेषत: शेतकऱ्यांवर खूप प्रेम होतं. त्यांना लोकांच्या जीवनात प्रकाश आणायचा होता. दिवंगत पद्मविभूषण रामोजी राव यांनी पत्रकारितेतील मूल्यांचं पालन केलं. त्यांनी केलेल्या कार्याची माहिती आजच्या पिढीला देण्याची गरज आहे. अनेक लोक 'पद्मविभूषण' रामोजी राव यांच्या सहवासाबद्दल विविध व्यासपीठांवर शिकलेल्या गोष्टी शेअर करत आहेत. ती सर्व गोळा करुन चांगली पुस्तकं प्रकाशित करावीत. रामोजी राव यांच्यासारख्या महान आणि समाजावर सकारात्मक प्रभाव टाकणाऱ्या व्यक्तीची इतिहासात नोंद होणं आवश्यक आहे. 'पद्मविभूषण' रामोजी राव यांची चिकाटी, त्यांचं समाजाप्रती असलेलं प्रेम आणि लोकांसाठी उभं राहण्याची त्यांची तळमळ तरुणांनी प्रेरणा म्हणून घेतली पाहिजे. त्यांनी उच्च पदावर पोहोचून समाजाचं प्रबोधन करुन देशाला बलशाली बनवण्यास मदत करावी. 'पद्मविभूषण' रामोजी राव कोणत्याही विषयाचा बारकाईनं अभ्यास करायचे. वक्तशीरपणा आणि शिस्तीचं दुसरं नाव म्हणून 'पद्मविभूषण' रामोजी राव यांची ओळख आहे. 'पद्मविभूषण' रामोजी राव हे अतिशय सामान्य कुटुंबातून आले असले तरी, त्यांनी आत्मविश्वासानं आपला प्रवास सुरू केला. त्यांचा हा प्रवास अतिशय शक्तिशाली आणि कुशल झाला. हाती घेतलेल्या प्रत्येक कार्यात 'पद्मविभूषण' रामोजी राव हे अजिंक्य राहिले. त्यांनी केलेली प्रत्येक कृती अनुकरणीय आहे. रामोजी राव यांनी कधीही आपल्या अधिकाराचा गैरवापर केला नाही, ते अतिशय विनम्र जीवन जगले''

लोकांसाठी उभा राहणारा धाडसी माणूस : तेलुगू समाज आणि भारतीय पत्रकारितेवर 'पद्मविभूषण' रामोजी राव यांचा मोठा प्रभाव आहे. त्यांना पत्रकारांची फॅक्टरी म्हणता येईल. तेलुगू मीडियाकडं पाहिलं तर, प्रिंट, इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल मीडिया या कोणत्याही संस्थेत बहुतेक पत्रकारांची मुळं Eenadu आणि ETV मध्येच रुजली असल्याचं दिसून येते. त्यांनी घडवलेले अनेक पत्रकार उच्च पदांवर कार्यरत आहेत. दर्जेदार पत्रकार होण्यासाठी प्रशिक्षित केलेल्या अनेकांना पत्रकारितेचं कौशल्य शिकवण्याचं श्रेय 'पद्मविभूषण' रामोजी राव यांना जाते. मातीतून माणिक शोधून त्याच्या प्रतिभेचा सन्मान करण्यात 'पद्मविभूषण' रामोजी राव यांची बरोबरी कोणीही करू शकत नाही. लोकशाहीच्या स्तंभांपैकी एक असलेल्या मीडियाला लोकांच्या जवळ आणण्यासाठी Eenadu आणि ETV सारख्या संस्थांचं त्यांनी केलेलं नेतृत्व अतुलनीय आहे. नागरिकांना अचूक माहिती लगेच उपलब्ध करुन देण्यासाठी आणि सरकारी योजनांची चांगली समज निर्माण करण्यासाठी त्यांनी काम केलं. 'पद्मविभूषण' रामोजी राव यांनी माध्यमांमध्ये केलेले क्रांतिकारी बदल लाखो नागरिकांच्या जीवनात सकारात्मक बदल केले. नेत्यांनी निरंकुश होत जेव्हा लोकशाहीला धोका निर्माण केला तेव्हा 'पद्मविभूषण' रामोजी राव धैर्यानं नागरिकांच्या बाजूनं उभं राहिले'', असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

आपत्तीच्या वेळी सर्वप्रथम मदतीसाठी होते तत्पर : "दिवंगत 'पद्मविभूषण' रामोजी राव यांचा आणखी एक पैलू म्हणजे विचारांचा सतत ताजेपणा त्यांच्याकडं होता. विशेष म्हणजे चक्रीवादळ, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्तीत 'पद्मविभूषण' रामोजी राव यांनी केवळ जमीनच दान केली नाही, तर समाजातील देणगीदारांना मदतीचं आवाहन केलं. त्यांच्या सहकार्यानं बेघरांसाठी घरं बांधण्याचे चांगले प्रकल्प केले. तेलगू भाषेच्या जतनासाठी रामोजी राव यांनी खूप मेहनत घेतली आहे," असंही माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी यावेळी स्पष्ट केलं. यावेळी ईनाडूचे संचालक सी किरन म्हणाले की, आमच्या वडिलांनी आम्हाला शिकवलेली शिस्त आणि जीवन मूल्यं कधीच कमी होणार नाहीत.

रामोजी राव यांच्या कार्याचा गौरव म्हणून देण्यात यावा भारतरत्न - मुरली मोहन : माजी खासदार मुरली मोहन म्हणाले की ''रामोजी राव यांनी एनटीआर यांना नवीन समाजात बदल घडवून आणण्यासाठी राजकारणात येण्यास सांगितलं. पक्ष स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या निवडणुकात प्रतिनिधी म्हणून कोणाची नियुक्ती करायची याबाबत संभ्रम होता. अशावेळी पद्मविभूषण रामोजी राव यांनी गावोगावात जाऊन चांगल्या आणि प्रामाणिक लोकांची निवड केली. 'पद्मविभूषण' रामोजी राव यांनी रामाराव यांना प्राधान्यानं निवडण्यास सांगितलं. तेलुगुदेसम हा प्रादेशिक पक्ष स्थापन झाल्यानंतर तो 9 महिन्यात सत्तेवर आला, त्याचं मूळ कारण 'पद्मविभूषण' रामोजी राव आहेत. मात्र तरीही रामोजी राव यांनी कधीही आपल्या फायद्यांची अपेक्षा केली नाही. एनटीआरला 'पद्मविभूषण' रामोजी राव यांनी सांगितलं की, ते सरकारमधील चुका दाखवून ईनाडूमध्ये त्यांच्यावर टीका करतील. मोठ्या बँका दिवाळखोरीत जात असताना आजपर्यंत मार्गदर्शी ही सर्वात विश्वासार्ह संस्था आहे. रामोजी राव हे नीतिमान आणि प्रामाणिक असल्यानं ते कोणालाही घाबरले नाहीत. केवळ पत्रकारिता आणि चित्रपट क्षेत्रातच नव्हे, तर समाजातील त्यांच्या सेवांचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न देण्यात यावा,'' अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

हेही वाचा :

  1. रामोजी राव यांना भारतरत्न देणं आपली जबाबदारी - मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू; अमरावतीच्या विकासासाठी किरण राव यांनी दिले १० कोटी रुपये - commometation meeting of Ramoji Rao
  2. रामोजी ग्रुपचे संस्थापक दिवंगत 'पद्मविभूषण' रामोजी राव यांना आंध्रप्रदेश सरकारकडून आदरांजली; विजयवाडामध्ये अभिवादन सभेचं आयोजन - AP Govt Tribute To Ramoji Rao
  3. माध्यमसम्राट रामोजी राव यांच्या पुतळ्याचं होणार अनावरण; भावी पिढ्यांना मिळणार प्रेरणा - Ramoji Rao statue unveiled

Last Updated : Jul 18, 2024, 2:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.