ETV Bharat / bharat

रामोजी रावांनी मृत्यूपूर्वीच बांधलं होतं स्वत:चं स्मारक! - Ramoji Rao Smriti Vanam

Ramoji Rao Smriti Vanam : रामोजी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रामोजी राव यांचं पार्थिव आज (9 जून) अनंतात विलीन झाले. मृत्यूपूर्वीच त्यांनी स्वत:साठी एक स्मारक बांधलं होतं जिथं त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.

ramoji rao founder and chairman of ramoji group smriti vanam in ramoji film city
रामोजीराव स्मारक (Source ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 9, 2024, 3:51 PM IST

हैदराबाद Ramoji Rao Smriti Vanam : रामोजी ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष रामोजी राव यांनी मृत्यूपूर्वीच त्यांचं स्मारक तयार करून ठेवलं होतं. रामोजी फिल्मसिटीच्या विस्तीर्ण परिसरात त्यांनी बांधलेल्या स्मारकात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. तेलंगणा सरकारनं अधिकृत समारंभांसह रामोजीराव यांच्यावर अंत्यसंस्कार केले.

रामोजी फिल्म सिटी येथे मीडिया सम्राट रामोजी राव यांचं स्मृती वनम : रामोजी समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष रामोजी राव यांचे हृदयासंबंधित समस्येमुळं हैदराबाद येथील रुग्णालयात निधन झालं. या महिन्याच्या 5 तारखेला त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रकृती अस्वास्थ्यामुळं शनिवारी पहाटे 4.50 वाजता त्यांचं निधन झालं.

रामोजी राव यांच्य पार्थिवावर अंत्यसंस्कार: रामोजी राव यांच्या पार्थिवावर आज रामोजी फिल्म सिटीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तेलंगणा सरकारनं त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले. आंध्र प्रदेश सरकारनं रविवारी आणि सोमवारी राज्याचा शोक जाहीर केलाय. अंत्यसंस्काराच्या वेळी आंध्र प्रदेशचे दिग्गज नेते आणि भावी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उपस्थित होते.

रामोजी राव यांच्यावर शासकीय सन्मानानं अंत्यसंस्कार: रामोजीरावांनी त्यांचे स्मारक आधीच तयार केले होते. रामोजी फिल्मसिटीच्या विस्तीर्ण परिसरात त्यांनी बांधलेल्या स्मारकात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. CWC बैठकीला उपस्थित राहण्यासाठी शुक्रवारी रात्री दिल्लीला गेलेले मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी तेथून राज्य सरकारच्या मुख्य सचिव शांतीकुमारी यांना सूचना दिल्या. मुख्यमंत्र्यांनी रामोजी राव यांच्या कुटुंबीयांशी फोनवरून चर्चा केली.

रंगारेड्डीचे जिल्हाधिकारी के. शशांक, सायबराबादचे पोलीस आयुक्त अविनाश महंती, एलबीनगरचे डीसीपी प्रवीण कुमार, जिल्हा अतिरिक्त जिल्हाधिकारी भूपाल रेड्डी आणि इब्राहिमपट्टणमचे आरडीओ अनंत रेड्डी यांनी शनिवारी रामोजी फिल्म सिटीच्या स्मृती वनम येथे होणाऱ्या अंत्यसंस्काराच्या व्यवस्थेची पाहणी केली. अनेक मुख्यमंत्री, मान्यवर आणि मोठ्या संख्येनं लोकप्रतिनिधींचं आगमन पाहता सीएस पोलीस अधिकाऱ्यांना सशस्त्र सुरक्षा व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसंच पोलिसांनी रामोजी फिल्म सिटीच्या प्रतिनिधींना अंत्यसंस्कार कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण स्थळाबाहेर एलईडी स्क्रीनद्वारे करण्याचे निर्देश दिले होते.

हेही वाचा -

  1. रामोजी रावांच्या आयुष्यातील सोनेरी क्षण, कधीही न पाहिलेले दुर्मिळ फोटो पाहा.... - RAMOJI RAO Photo
  2. रामोजी राव अनंतात विलीन, भविष्यातील पिढींसाठी मिळणार प्रेरणा - Ramoji Rao Last rites
  3. रामोजी फिल्म सिटी एक जादुई ठिकाण! जिथं स्वप्नं सत्यात उतरतात - Ramoji Rao Passed Away

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.