ETV Bharat / bharat

हजार वर्ष टिकेल असं हे भव्यदिव्य 'राम मंदिर'; बांधण्यासाठी आतापर्यंत 'इतका' आलाय खर्च

Ram Mandir Construction Cost : अयोध्येतील तात्पुरत्या मंदिरात रामलल्लांची मूर्ती ठेवण्यात आली होती. आता 22 जानेवारीला नव्या मंदिरात श्री रामाची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. राम मंदिर एक हजार वर्ष टिकेल असा दावा करण्यात आलाय. मात्र, हे मंदिर बांधण्यासाठी आतापर्यंत किती खर्च आलाय हे तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर...

Ram Mandir
Ram Mandir
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 10:43 PM IST

अयोध्या Ram Mandir Construction Cost : राम मंदिर बांधण्यासाठी आतापर्यंत करोडो रुपये खर्च झाले आहेत. राम मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंत 1 हजार 100 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला असून, काम पूर्ण करण्यासाठी आणखी 300 कोटी रुपयांची गरज भासू शकते, अशी माहिती रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचं खजिनदार गोविंद देव गिरी यांनी दिली. त्यामुळं हे मंदिर किती भव्य आहे याचा अंदाज आपल्याला आला असेल.

मंदिरासाठी किती खर्च आलाय? : अयोध्येत सोमवारी राम मंदिरात प्रभु श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या सोहळ्यात दिग्गज राजकीय नेते, खेळाडू, अभिनेते यासह तब्बल सात इजार रामभक्त सहभागी होणार आहेत. दरम्यान, राम मंदिराच्या उभारणीसाठी आतापर्यंत तब्बल 1 हजार 100 कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. तसंच आणखी बांधकाम बाकी असल्यानं 300 कोटी रुपयांची गरज भासू शकते, असं श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे खजिनदार गोविंद देव गिरी यांनी म्हटलंय.

गर्भगृहात रामलल्लाची 51 इंची मूर्ती : गेल्या आठवड्यात राम मंदिराच्या गर्भगृहात रामलल्लांची 51 इंची मूर्ती ठेवण्यात आली होती. प्रभु श्रीरामाच्या तीन मूर्ती यावेळी बनवण्यात आल्या होत्या. त्यापैकी म्हैसूरचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी तयार केलेल्या मूर्तीची अभिषेकासाठी निवड करण्यात आली आहे. अरुण योगीराज यांनी बनवलेल्या श्रीरामाच्या मूर्तीच्या निवडीबद्दल गिरी म्हणाले, "तिघांपैकी एक मूर्ती निवडणे आमच्यासाठी खूप अवघड होते. त्या सर्व मूर्ती अतिशय सुंदर आहेत, आम्ही दिलेल्या निकषांवर सर्व मूर्ती तयार करण्यात आल्या आहेत."

दुसऱ्या मजल्यावरचं काम सुरू : मंदिराचा एक मजला पूर्ण झाला आहे आणि दुसऱ्या मजल्यावर काम सुरू आहे. लवकर हे सर्व बांधकाम पूर्ण केले जाणार आहे. हे मंदिर पुढील जवळपास एक हजार वर्ष टिकेल, असा दावा मंदिर प्रशासनाकडून करण्यात आलाय. ऊन, वारा, पाऊस, भूकंप या कशाचाही परिणाम हा भव्य मंदिरावर होणार नाही, असंही सांगण्यात आलंय.

हेही वाचा -

  1. राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' जमावानं अडवली, मोदी-मोदीच्या घोषणा, फ्लाइंग किसनं उत्तर
  2. चित्रपटगृहात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करा; मंत्री उदय सामंतांचं आवाहन
  3. चित्रपटगृहात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं थेट प्रक्षेपण करा; मंत्री उदय सामंतांचं आवाहन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.