ETV Bharat / bharat

राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा पाचवा दिवस; आज कोणती पूजा होणार?

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 20, 2024, 11:08 AM IST

Updated : Jan 20, 2024, 1:14 PM IST

Ram Mandir Pran Pratishtha Fifth Day : रामनगरी अयोध्यामध्ये मंगळवारपासून राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा सुरु आहे. आज या सोहळ्याचा पाचवा दिवस आहे. सकाळपासूनच आजच्या पूजेला सुरुवात झालीय.

Ram Mandir Pran Pratishtha Fifth Day
Ram Mandir Pran Pratishtha Fifth Day

अयोध्या Ram Mandir Pran Pratishtha Fifth Day : रामनगरी अयोध्येत 22 जानेवारी रोजी होणाऱ्या प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रमासाठी मंगळवारपासून पूजा सुरु झाल्या आहेत. आज शनिवारी पूजेचा पाचवा दिवस आहे. आज रामलल्लाचा साखर निवास आणि फळ निवास असेल. सकाळपासून रामलल्लाला 'शर्कराधिवासा'त ठेवण्यात येणार आहे. यानंतर फळांमध्ये ठेवण्यात येईल. यानंतर संध्याकाळी पुन्हा सुगंधित फुलांमध्ये ठेवण्यात येणार आहे. आजच्या पूजेचा रामभक्तांमध्येही उत्साह आहे. काल रामलल्लाचं पूर्ण चित्र समोर आल्यावर भाविक भावूक झाले होते. आजही शहरभर धार्मिक पूजेसोबत विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.

कोण करणार पूजा : डॉ अनिल मिश्रा हे सर्व पूजेचे प्रमुख यजमान असणार आहेत. याशिवाय ट्रस्टशी संबंधित अन्य अधिकारी आणि 121 आचार्य असतील. तर श्री गणेशवर शास्त्री द्रविड हे सर्व प्रक्रियेचं निरीक्षण, समन्वय आणि मार्गदर्शन करतील. काशीचे लक्ष्मीकांत दीक्षित हे प्रमुख आचार्य असणार आहेत.

विविध परंपरांचं समायोजन : शैव, वैष्णव, शाक्त, गणपत्य, पट्य, शीख, बौद्ध, जैन, दशनम शंकर, रामानंद, रामानुज, निंबार्क, माधवा, विष्णू नामी, रामसनेही, घिसपंथ, गरीबदासी, गौडिया, कबीरपंथी, वाल्मी शंकरदेव (आसाम), माधव देव, इस्कॉन, रामकृष्ण मिशन, चिन्मय मिशन, भारत सेवाश्रम संघ, गायत्री परिवार, अनुकुलचंद्र ठाकूर परंपरा, ओडिशाचा महिमा समाज, अकाली, निरंकारी, नामधारी (पंजाब), राधास्वामी आणि स्वामीनारायण, शारवकर, वारकरी आदी परंपरा पूजेचा भाग बनणार आहेत.

शुक्रवारी औषधी, केशराधिवास पूजा पार पडली : विवेक सृष्टी संकुलात मंगळवारी प्रायश्चित्त आणि कर्म कुटीची पूजा करण्यात आली. बुधवारी रामलल्लाचा मंदिरात प्रवेश झाला. तर गुरुवारी रामलल्लाला गर्भगृहात विराजमान करण्यात आलंय. याआधी 19 जानेवारी रोजी सकाळी औषधी, केशराधिवास आणि घृताधिवास पूजा पार पडली, तर सायंकाळी धनाधिवास पूजा पार पडली. काल दिवसभरात रामलल्लाची अनेक छायाचित्रं एकामागून एक समोर आली होती.

हेही वाचा :

  1. 22 जानेवारीला महाराष्ट्रात सार्वजनिक सुट्टी जाहीर
  2. प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी अयोध्येसह अवघा देश सजला; सांगलीच्या तरुणाची अयोध्या नगरीत रांगोळी

Last Updated : Jan 20, 2024, 1:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.