सूरत Ram Mandir Ayodhya : बाल कथावाचक चिमुकलीनं अकराव्या वर्षापासून कथावाचन करुन रक्कम जमा केली. या जमा झालेल्या रकमेतून राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टला तब्बल 52 लाख रुपयाचं योगदान दिलं आहे. भाविका माहेश्वरी असं या कथा वाचक बालिकेचं नाव आहे. भाविकानं आतापर्यंत 50 हजार किमीपेक्षा जास्त प्रवास केला आहे. तर 300 पेक्षा जास्त कार्यक्रम केले आहेत. रामायणात रामसेतू बांधताना 'खारुताईं'नी योगदान दिल्याचा उल्लेख आहे. त्यामुळं रामसेतूमध्ये जसं सगळ्यांचं योगदान होतं, तसंच राम मंदिर बांधताना सगळ्यांचं योगदान असल्याचं स्पष्ट होत आहे.
'खारुताई' जशी प्रभू श्रीरामाच्या मदतीला आली होती, तसंच मी राम मंदिर निर्माणात योगदान दिलं आहे. मला माझ्या माता पित्याकडून प्रेरणा मिळाली आहे. मी लहानपणापासूनच रामायण आणि रामकथा वाचत आली आहे. कितीतरी पिढ्यांनी राम मंदिर पाहिलं नाही. मात्र आमची पिढी भाग्यवान आहे, आम्ही भव्य राम मंदिर बांधताना पाहत आहोत. - भाविका माहेश्वरी
भाविका आहे बाल कथावाचक : भाविका माहेश्वरी ही सूरतमधील बाल कथावाचक आहे. भाविकानं वयाच्या अकराव्या वर्षापासून रामकथा वाचण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी भाविकानं आतापर्यंत 50 हजार किमीचा प्रवास केला आहे. या प्रवासात भाविकानं तब्बल 300 कार्यक्रम केले आहेत. या कार्यक्रमातून भाविका माहेश्वरीनं तब्बल 51 लाख रुपये जमा केले आहेत. रामभक्त असलेल्या भाविकानं ही रक्कम जमा केल्यानं तिचं कौतुक करण्यात येत आहे.
50 लाख रुपये केले राम मदिराला दान : अयोध्येत राम मंदिराचं निर्माण होत असताना भाविकानंही आपण मंदिर निर्माणात योगदान देण्याचं निश्चित केलं. याबाबत भाविकानं तिच्या आई वडिलांना सांगितलं. त्यांनीही भाविकाला प्रोत्साहन दिलं. भाविकाला लहानपणापासूनच रामायणात रस होता. त्यामुळंच भाविकानं रामकथा वाचण्यास सुरुवात केली. भाविकानं कोविड सेंटर, सार्वजनिक सभा आणि कारागृहातही रामकथा वाचल्या आहेत. रामकथा वाचून भाविकानं नागरिकांना चांगलं वर्तन करण्यास प्रोत्साहन दिलं आहे. भाविकानं तब्बल 15 रामकथा केल्या आहेत. त्यातून भाविकाला 52 लाख रुपये जमा केले आहेत. ही रक्कम भाविकानं राम मंदिर तीर्थक्षेत्र ट्रस्टला दान केली आहे.
कारागृहात वाचल्या रामकथा : प्रभू श्रीराम मंदिराच्या निर्माणासाठी 2021 मध्ये निधी जमा करण्यासाठी अभियान सुरू करण्यात आलं. यावेळी राम मंदिराच्या निर्माण कार्यात मदत देण्याचा भाविका माहेश्वरीनं संकल्प केला. त्यासाठी भाविकानं कारागृहात कार्यक्रम करण्याचं ठरवलं. भाविकाची रामकथा ऐकून कारागृहातील बंदीवानांनी एक लाख रुपये दिले. अशाच प्रकारे इतर ठिकाणीही निधी जमा करण्यात आल्याची माहिती भाविकाच्या निकटवर्तीयांनी दिली.