ETV Bharat / bharat

वऱ्हाडावर काळाचा घाला; ट्रॅक्टर ट्रॉली पलटून 13 जणांचा मृत्यू तर 16 जण गंभीर - Rajgarh Road Accident - RAJGARH ROAD ACCIDENT

Rajgarh Road Accident : वऱ्हाडानं भरलेली ट्रॅक्टर ट्रॉली पलटून मोठा अपघात झाला. या अपघातात 13 वऱ्हाड्यांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना मध्यप्रदेशमधील राजगड इथं रविवर

Rajgarh Road Accident
संपादित छायाचित्र (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 3, 2024, 6:37 AM IST

Updated : Jun 3, 2024, 8:54 AM IST

भोपाळ Rajgarh Road Accident : वऱ्हाडाची ट्रॅक्टर ट्रॉली पलटून 13 जणांचा मृत्यू झाल्यानं मोठी खळबळ उडाली. ही घटना मध्य प्रदेशातील राजगड जवळील पीपलोदी इथं रविवारी रात्री घडली. या घटनेत 16 वऱ्हाडी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये 4 लहान चिमुकल्यांचा समावेश असल्यानं हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राजस्थानमधील मोतीपुरा इथून हे वऱ्हाडी कुलामपूर इथं जात असल्याची प्राथमिक माहिती सूत्रांनी दिली आहे.

राजस्थानवरुन येत होते वऱ्हाडी : मध्यप्रदेशातील राजगडमधील पीपलोदी इथं वऱ्हाडाची ट्रॅक्टर ट्रॉली पलटून मोठा अपघात झाला. या अपघातात तब्बल 13 नागरिकांचा मृत्यू झाला. तर 16 जण गंभीर जखमी झाले. या अपघातातील वऱ्हाडी हे राजस्थानातील मोतीपुरा इथून कुलामपूर इथं जात होते. यावेळी ट्रॅक्टरची ट्रॉली पलटली. हा अपघात इतका भीषण होता, की यातील अनेक वऱ्हाड्यांचा जागीच मृत्यू झाला. या मृतांमध्ये 4 चिमुकल्यांचा समावेश आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी व्यक्त केलं दु:ख : राजस्थानच्या वऱ्हाड्यांवर मध्यप्रदेशमध्ये काळानं घाला घातला. यावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दु:ख व्यक्त केलं. "मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातात अनेकांचा मृत्यू झाल्याची बातमी अत्यंत दु:खद आहे. ज्यांनी आपल्या नातेवाईकांना गमावलं त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी संवेदना व्यक्त करते. तसेच जखमी वऱ्हाड्यांना लवकरात लवकर बरं होण्यासाठी प्रार्थना करते," अशा बावना त्यांनी एक्सवर नमूद केल्या आहेत.

मुख्यमंत्री मोहन यादव यांनी व्यक्त केलं दु:ख : वऱ्हाड्यांच्या अपघाताची माहिती मिळताच मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी घटनेची दखल घेतली. त्यांनी एक्स या सोशल माध्यमांवर आपलं दु:ख व्यक्त केलं. यावेळी त्यांनी नमूद केलं की, "राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यातील नागरिकांचा राजगड अपघातात मृत्यू दुर्दैवी झाला. घटनास्थळावर मंत्री नारायण सिंग पंवर हे पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकाऱ्यांसह दाखल झाले आहेत. राजस्थान पोलीसही घटनास्थळावर दाखल झाले आहेत. गंभीर जखमींना भोपाळला हलवण्यात आलं आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. आम्ही सतत राजस्थान सरकारच्या संपर्कात आहोत. बाबा महाकाल मृतात्म्यांना शांती तथा त्यांच्या परिवाराला या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो."

हेही वाचा :

  1. पुणे कार अपघात प्रकरण; बदललेले 'ते' रक्ताचे नमुने आरोपीच्या आईचे - Pune Porsche Accident Case
  2. बालासोरप्रमाणं रेल्वे अपघात टळला! पंजाबमध्ये दोन मालगाड्यांची समोरासमोर धडक, नेमकं काय घडलं? - Fatehgarh Sahib Train Accident
  3. पुणे जिल्ह्यात हिट अँड रनची पुनरावृत्ती, अल्पवयीन मुलीनं दोघांना उडवलं; एकाचा मृत्यू पोलीस पाटलाच्या मुलीचा प्रताप - minor daughter hit two bike riders

Last Updated : Jun 3, 2024, 8:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.