गुवाहाटी Rahul Gandhi vs Himanta Biswa Sarma : काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लोकसभा निवडणुकीनंतर अटक केली जाईल, ज्यांच्याविरुद्ध इथं हिंसाचार भडकवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आलाय, असं आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी बुधवारी सांगितलं. काँग्रेसच्या 'भारत जोडो न्याय यात्रे'दरम्यान हिंसाचार भडकवल्याबद्दल आसाम पोलिसांनी मंगळवारी राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाच्या इतर अनेक नेत्यांविरोधात स्वत:हून गुन्हा नोंदवला होता.
-
Assam CM Himanta Biswa Sarma speaks on Congress MP Rahul Gandhi's Bharat Jodo Nyay Yatra.
— ANI (@ANI) January 25, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
He says, "The main aim was to destabilize Assam. Now he wants to do Nyay Yatra in Dhubri. Do it, I have no objection. We will arrest him after the Lok Sabha election. If we arrest him… pic.twitter.com/VBLMnXpqYx
">Assam CM Himanta Biswa Sarma speaks on Congress MP Rahul Gandhi's Bharat Jodo Nyay Yatra.
— ANI (@ANI) January 25, 2024
He says, "The main aim was to destabilize Assam. Now he wants to do Nyay Yatra in Dhubri. Do it, I have no objection. We will arrest him after the Lok Sabha election. If we arrest him… pic.twitter.com/VBLMnXpqYxAssam CM Himanta Biswa Sarma speaks on Congress MP Rahul Gandhi's Bharat Jodo Nyay Yatra.
— ANI (@ANI) January 25, 2024
He says, "The main aim was to destabilize Assam. Now he wants to do Nyay Yatra in Dhubri. Do it, I have no objection. We will arrest him after the Lok Sabha election. If we arrest him… pic.twitter.com/VBLMnXpqYx
लोकसभेनंतर राहुल गांधींना करणार अटक : गुन्हा दाखल झाल्यानंतर राहुल गांधी म्हणाले की, "भारतीय जनता पक्ष (भाजपा) शासित आसाम सरकार 'त्यांना हवे तितके खटले नोंदवू शकते' परंतु मी घाबरलो नाही." यानंतर शिवसागर जिल्ह्यातील नाझिरा इथं एका कार्यक्रमादरम्यान सरमा म्हणाले, "आम्ही एफआयआर नोंदवलाय. विशेष तपास पथक तपास करेल आणि लोकसभा निवडणुकीनंतर त्यांना अटक केली जाईल. कारण काही महिन्यांनी लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत."
विविध कलमांखाली गुन्हे दाखल : गुन्हेगारी कट, बेकायदेशीर सभा, दंगल, हल्ला किंवा सार्वजनिक सेवकांना त्यांचं कर्तव्य पार पाडण्यापासून परावृत्त करण्यासाठी गुन्हेगारी शक्ती, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करणं यासंबंधित भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली काँग्रेस नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. आसामचे पोलीस महासंचालक (डीजीपी) जी पी सिंग यांनी सांगितलं की, "अतिरिक्त पोलीस महासंचालक (सीआयडी) यांनी स्थापन केलेल्या एसआयटीमार्फत कसून तपास करण्यासाठी हे प्रकरण आसाम सीआयडीकडे वर्ग करण्यात आलंय."
मुख्यमंत्र्यांनी स्वतः दिले होते निर्देश : सरमा यांनी मंगळवारी गुवाहाटी शहरात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात जमावाला बॅरिकेड तोडण्यासाठी चिथावणी दिल्याबद्दल राहुल गांधींविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे निर्देश राज्याचे पोलीस महासंचालकांना दिले होते. यात काँग्रेस समर्थकांनी बॅरिकेड्स हटवल्यानंतर त्यांची पोलिसांशी झटापट झाली. यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष भूपेन बोरा आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देबब्रत सैकिया जखमी झाले.
हेही वाचा :