सुरत Bharat Jodo Nyaya Yatra : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज नंदुरबारमध्ये दाखल होणार आहे. भारत जोडो न्याय यात्रा शनिवारी सुरत जिल्ह्यात दाखल झाली होती. मंगरूळ तालुक्यातील ढंखवावमध्ये यात्रेचं स्वागत करण्यात आलं होतं. यावेळी राहुल गांधी यांच्या यात्रेत सहभागी होण्यासाठी हजारे समर्थक तिथे दाखलं झाले होते.
दुपारी 3.30 वाजता नंदुरबारमध्ये दाखल : आज चौथ्या दिवशी सुरतहून यात्रा मांडवीला पोहोचणार आहे. तिथं यात्रेचं स्वागत केल्यानंतर मांडवी येथून ही यात्रा बारडोलीच्या ऐतिहासिक स्वराज आश्रमात दाखलं होणार आहे. यावेळी राहुल गांधी आश्रमाला भेट देतील. बार्डोली येथील अमर जवान चौकातही राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेचं स्वागत करण्यात येणार आहे. यानंतर राहुल गांधी बारडोलीतील सरदार चौकात जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. सभेनंतर यात्रा व्याराकडं रवाना होईल. तेथून दुपारी दोन वाजता सोनगड येथे भोजनासाठी यात्रा थांबणार आहे. त्यापूर्वी सोनगडमध्ये राहुल गांधींचे स्वागत करण्यात येणार आहे. यात्रेच्या तिसऱ्या दिवशी राहुल गांधी यांनी नर्मदा जिल्ह्यातील 70 सामाजिक संस्थांची भेट घेऊन चर्चा केली. या बैठकीला नर्मदा जिल्ह्यातील कुंवरपारा येथे झालेल्या या बैठकीला शेतकरी, आदिवासी, दलित प्रश्नांवर काम करणारे कार्यकर्तेही उपस्थित होते. भरुचमधील जाहीर सभेला आपच्या आमदार चैत्रा वसावाही उपस्थित होत्या.
- समान न्यायासाठी यात्रा : भारत जोडो यात्रेनंतर राहुल गांधींनी भारत जोडो न्याय यात्रा काढली आहे. यात्रेची सुरुवात मणिपूरपासून झाली आहे. देशातील प्रत्येक नागरिकाला समान आर्थिक, राजकीय आणि सामाजिक न्याय मिळवून देणं हा या यात्रेचा उद्देश आहे. देशातील सर्व नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही भारत जोडो न्याय यात्रा आहे.
भारत जोडो न्याय यात्रेत अनेकांचा सहभाग : राहुल गांधींच्या या भारत जोडो न्याय यात्रेत सुरुवातीपासूनच इतर राज्यातील लोकही राहुल गांधींशी जोडले गेले आहेत. भारत जोडो न्याय यात्रेत केरळ, छत्तीसगड, तामिळनाडूमधील काँग्रेस कार्यकर्त्यांचा समावेश आहे. तसंच केरळमधील वायनाड काही कार्यकर्ते न्याय यात्रेत सहभागी झाले आहेत. राहुल गांधी सध्या वायनडमधून विद्यामान खासदार आहेत. याच मतदार संघात पुन्हा त्यांना काँग्रेसनं उमेदवारी जाहीर केलीय.
- राहुल गांधी हे 12 मार्च ते 17 मार्चदरम्यान महाराष्ट्रात असणार आहेत. भारत जोडो न्याय यात्रेत राहुल गांधी हे धुळे, नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई उपनगर आणि मुंबई शहर आणि जिल्ह्यांमधून प्रवास करणार आहेत. नंदुरबारमधील आदिवासी न्याय संमेलनात सहभाग घेणार आहेत.
हे वाचलंत का :