ETV Bharat / bharat

मोदी सरकारची मुत्सद्देगिरी यशस्वी, कतारच्या ताब्यातील 8 माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांची सुटका

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 12, 2024, 6:32 AM IST

Updated : Feb 12, 2024, 8:41 AM IST

Qatar Navy Officers : कतारच्या ताब्यात असलेल्या 8 भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका झाली आहे. त्यांना ऑगस्ट 2022 मध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

Qatar
Qatar

नवी दिल्ली Qatar Navy Officers : कतारनं आपल्या ताब्यात असलेल्या आठ भारतीय माजी नौदल अधिकाऱ्यांची सुटका केली आहे. त्यापैकी सात जण सोमवारी (12 फेब्रुवारी) पहाटे भारतात परतले.

पंतप्रधान मोदींचे आभार मानले : "कतारमध्ये अटकेत असलेल्या दाहरा ग्लोबल कंपनीसाठी काम करणाऱ्या आठ भारतीय नागरिकांच्या सुटकेचं भारत सरकार स्वागत करते. या आठपैकी सात जण भारतात परतले आहेत. या नागरिकांच्या सुटकेच्या कतारच्या निर्णयाचं आम्ही कौतुक करतो," असं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलं. कतारहून परतलेल्या एका माजी नौसैनिकानं म्हटलं की, "आम्ही सुरक्षितपणे भारतात परतलो याचा खूप आनंद आहे. आम्ही भारतात परत येण्यासाठी जवळजवळ 18 महिने वाट पाहिली. आम्ही पंतप्रधान मोदींचे आभार मानू इच्छितो. हे केवळ त्यांच्या वैयक्तिक हस्तक्षेपामुळेच शक्य झालंय."

हेरगिरीच्या आरोपाखाली अटक : हे आठ माजी नौसैनिक कतारच्या दोहास्थित अल दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीजमध्ये काम करत होते. त्यांना ऑगस्ट 2022 मध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. मात्र, हे आरोप कधीच सार्वजनिक झाले नाहीत. या सर्वांवर पाणबुडी प्रकल्पाची हेरगिरी केल्याचा आरोप असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे. अल दहरा ग्लोबल कंपनी कतारच्या सैन्य दलांना आणि इतर सुरक्षा संस्थांना प्रशिक्षण आणि इतर सेवा पुरवते.

ऑक्टोबर 2023 फाशीची शिक्षा सुनावली : एका वर्षाहून अधिक काळ तुरुंगात घालवल्यानंतर या माजी नौसैनिकांना ऑक्टोबर 2023 मध्ये कतारमधील कनिष्ठ न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावली होती. या संदर्भात कतारनं यापूर्वी कोणतीही माहिती न दिल्यानं भारत सरकारला मोठा धक्का बसला होता. भारतानं या निर्णयाविरोधात अपील केलं होतं. त्यानंतर कतारनं या 8 अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा रद्द केली होती.

कतार भारतासाठी महत्त्वाचा : दुबईत COP-28 परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कतारचे अमीर शेख तमीम बिन हमाद अल थानी यांच्यात झालेल्या बैठकीच्या चार आठवड्यांच्या आत ही घोषणा करण्यात आली होती. 1 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले होते की, मी कतारमध्ये राहणाऱ्या भारतीय समुदायाबद्दल अमीरांशी बोललो होतो. कतार हा भारताला नैसर्गिक वायूचा पुरवठा करणारा महत्त्वाचा देश आहे. सुमारे आठ लाख भारतीय तेथे काम करतात. दोन्ही देशांमध्ये नेहमीच चांगले संबंध राहिले आहेत.

हे वाचलंत का :

  1. आठ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांची फाशीची शिक्षा कमी, कतार न्यायालयाचा निर्णय
  2. भारताचं मोठं यश! 8 माजी भारतीय नौसैनिकांच्या फाशीला मिळणार स्थगिती? कतार न्यायालयानं स्वीकारलं अपील

Last Updated : Feb 12, 2024, 8:41 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.