खन्ना (पंजाब) Engine Detached From Train : पंजाबमधील खन्ना इथं रविवारी धावत्या रेल्वेचं इंजिन वेगळं झालं. हे इंजिन सुमारे 3 किमी अंतर कापत दूरपर्यंत पोहोचलं. यानंतर ट्रॅकवर काम करणाऱ्या ट्रॅकमॅननं अलार्म वाजवून लोको पायलटला याची माहिती दिली. यानंतर लोको पायलटनं इंजिन थांबवून इंजिन पुन्हा रेल्वेशी जोडलं.
नेमकं काय घडलं : याबाबत अधिक माहिती अशी की, पाटणाहून जम्मू तवीकडे जाणाऱ्या अर्चना एक्स्प्रेस गाडीला हा अपघात झालाय. रेल्वे क्रमांक 12355/56 अर्चना एक्स्प्रेस पाटण्याहून जम्मू तवीला जात होती. फतेहगढ साहिबमधील सरहिंद जंक्शन इथं त्याचं इंजिन बदलण्यात आलं. तिथं कर्मचाऱ्यांनी बोगींना इंजिन नीट जोडलं नाही. तरीही रेल्वे पुढं निघाली. यानंतर हे इंजिन खन्नामध्ये रेल्वेपासून वेगळं झालं. इंजिन खूप पुढं गेलं. लोको पायलटलालाही याची माहिती नव्हती. या गाडीत सुमारे दोन ते अडीच हजार प्रवासी होते. त्यामुळं मोठी दुर्घटना टळली आहे. सुदैवाची गोष्ट म्हणजे या वेळात दुसरी कोणतीही रेल्वे आली नाही. त्यामुळं हजारो प्रवाशांचे प्राण वाचले. या प्रकारानं रेल्वे प्रवासी घाबरले होते. इंजिन वेगळं झाल्यानंतरही लोको पायलटलाच्या लक्षात न आल्यानं इंजिन दोन-तीन किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचलं. त्यानंतर रेल्वे ट्रॅकवर काम करणाऱ्या ट्रॅकमॅननं अलार्म वाजवला. त्यानंतर इंजिन थांबलं.
इंजिन पुन्हा जोडून रेल्वे रवाना : याबाबत रेल्वेच्या गार्डनं सांगितलं की, इंजिन अचानक रेल्वेपासून वेगळं झालं. हे त्यानं पाहिल्यावर वायरलेसद्वारे संदेश पाठवला. ट्रॅकमॅननं सांगितलं की तो रेल्वे ट्रॅकवर काम करत होता. तेव्हा त्यानं पाहिलं की केवळ इंजिन येत आहे. तर रेल्वे सुमारे 3 किलोमीटर मागं उभी आहे. त्यानंतर त्याने आरडाओरडा केला. लोको पायलटलानं इंजिन थांबवलं. याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. हा प्रकार कळताच लोको पायलटलनं लगेच इंजिन परत आणले. त्यानंतर ते रेल्वेला जोडून पुढं निघालं.
हेही वाचा :