ETV Bharat / bharat

गांधी घराण्यातून तिसरा खासदार? प्रियंका गांधी 'या' मतदारसंघातून लढणार निवडणूक

गांधी घराण्यातील आणखी एक सदस्य थेट निवडणूक लढविणार आहे. काँग्रेस पक्षानं केरळमधील वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी निवडणूक लढविणार असल्याचं काँग्रेसनं मंगळवारी जाहीर केलं.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 10 hours ago

Priyanka Gandhi wayanad election
प्रियंका गांधी वायनाड निवडणूक (Source- ANI)

वायनाड: काँग्रेसनं वायनाड लोकसभा मतदारसंघाबरोबर पलक्कड आणि चेलाक्करा या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केले आहेत. प्रियका गांधी वायनाडमधून पोटनिवडणूक लढविणार आहेत. त्यांची ही पहिलीच निवडणूक असेल. केरळ युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष राहुल ममकूथिल हे पलक्कड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. अलाथूरचे माजी खासदार रम्या हरिदास यांची चेलाक्करा यांच्यासाठी निवड करण्यात आली आहे.

केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीनं (केपीसीसी) तयार केलेल्या उमेदवारांच्या यादीला हायकमांडनं मान्यता दिली आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे (AICC) सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी यापूर्वी राज्य नेतृत्वाच्या निर्णयानंतर उमेदवाराची घोषणा केली जाईल, असे सांगितलं होते. प्रियंका गांधी यांच्या वायनाडमधील उमेदवारीची औपचारिक घोषणा मंगळवारी करण्यात आली. यापूर्वीच जुलैपासून वायनाडमधील निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेसकडून हालचाली सुरू होत्या.

  • वायनाड जिल्हा काँग्रेस कमिटीचे (डीसीसी) उपाध्यक्ष ओव्ही अप्पाचन यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, प्रियंका गांधी यांना वायनाड मतदारसंघात किमान 8 लाख मते मिळावीत, यासाठी नियोजन करण्यात येत आहे. काँग्रेसनं स्थानिक काँग्रेस नेत्यांची टीम तयार केली आहे.
  • राहुल गांधींच्या बहुमतांची आकडेवारी-राहुल गांधी यांनी 2019 मध्ये वायनाडसह लोकसभा निवडणूक जिंकली होती. 2019 च्या निवडणुकीत राहुल गांधींना 7 लाख 6 हजार 367 मते मिळाली होती. या वर्षीदेखील त्यांनी लोकसभा निवडणुकीत वायनाडमध्ये विजय मिळवला. मात्र, गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांचे बहुमत थोडे कमी झाले. यावेळी राहुल यांना 6 लाख 47 हजार 445 मते मिळाली आहेत.

गांधी घराण्यातील तिसऱ्या खासदार असणार- राहुल गांधींनी रायबरेलीचे लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वायनाड लोकसभा मतदारसंघाची पुन्हा निवडणूक होत आहे. वायनाडमध्ये 13 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. वायनाड लोकसभा निवडणुकीतील विजयानंतर प्रियंका गांधी या गांधी घराण्यातील तिसऱ्या खासदार असणार आहेत. त्यांनी सक्रिय राजकारणात येण्यापूर्वी अमेठी आणि रायबरेली या काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर लक्ष केंद्रित केलं होते.

हेही वाचा-

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.