ETV Bharat / bharat

गांधी कुटुंबाचे जावई बाप्पू उतरणार निवडणुकीच्या मैदानात; रॉबर्ट वाड्रा म्हणाले 'अनेक पक्षांच्या आहेत ऑफर' - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : गांधी कुटुंबांचे जावई बाप्पू रॉबर्ट वाड्रा यांनी लोकसभा निवडणूक 2024 मध्ये अमेठीतून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अनेक पक्षांनी आपल्याला ऑफर दिल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे मतदारांच्या भूवया उंचावल्या आहेत.

Lok Sabha Election 2024
रॉबर्ट वाड्रा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 5, 2024, 10:26 AM IST

नवी दिल्ली Lok Sabha Election 2024 : गांधी कुटुंबांचे जावई बाप्पू रॉबर्ट वाड्रा हे लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. गांधी कुटुंबांचे हक्काचे मतदार संघ असलेल्या रायबरेली आणि अमेठी मतदार संघात कोण उमेदवार असणार आहे, याची उत्सुकता शिगेला असतानाच रॉबर्ट वाड्रा यांनी अमेठी लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. आपल्याला अनेक पक्षांच्या ऑफर असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

मी राजकारणात यावं, ही लोकांची इच्छा : काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड इथून उमेदवारीचा अर्ज दाखल केला आहे. त्यानंतर राहुल गांधी यांनी रोड शो करत भाजपावर टीका केली. त्यानंतर आता गांधी परिवारांचे हक्काचे मतदार संघ म्हणून गणले जाणारे रायबरेली आणि अमेठी मतदार संघातून कोण लढणार याबाबत मतदारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. त्यातच आता गांधी घराण्याचे जावई बाप्पू रॉबर्ट वाड्रा यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. "मी राजकारणात यावं, अशी लोकांची इच्छा आहे. मला संधी मिळाली तर मला अमेठीच्या लोकांमध्ये जाऊन त्यांच्यासाठी काम करायला आवडेल. मी प्रियंका गांधींसोबत 1999 मध्ये पहिल्यांदा अमेठीमध्ये निवडणूक प्रचार केला होता," असं रॉबर्ट वाड्रा यांनी दिलेल्या निवेदनात नमूद केलं आहे.

अमेठीतूनच लढणार निवडणूक : रॉबर्ट वाड्रा यांनी दिलेल्या निवेदनात आपल्या राजकारणात येण्याविषयी इच्छा व्यक्त केली आहे. यात त्यांनी "मी अमेठी, रायबरेली, जगदिशपूर आणि सुलतानपूरमध्ये सक्रिय आहे. आजही अमेठीचे लोक माझ्याशी जोडले आहेत. माझ्या वाढदिवशी लोक माझ्याशी संपर्क साधतात. जनतेच्या इच्छेनुसार मी राजकारणात पहिलं पाऊल टाकून खासदार होण्याचा विचार केला तर अमेठीचंच प्रतिनिधित्व करावं, अशी मतदारांची इच्छा आहे," असं त्यांनी यावेळी नमूद केल्यानं उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात ते अमेठीतून निवडणूक लढवणार असल्याची चर्चा सुरू झाली.

अमेठीचे मतदार विद्यमान खासदारांवर नाराज : "अमेठीच्या मतदारांनी तिथून राहुल गांधी यांना हरवलं. त्यानंतर विद्यमान खासदार तिथं येत नाहीत. त्या केवळ गांधी परिवारावर टीका करतात. मात्र विद्यमान खासदारांवर मतदार प्रचंड नाराज आहेत. विद्यमान खासदारांना निवडणून मतदारांनी चूक केली, असं त्यांना वाटते. त्या तिथल्या प्रगतीबाबत बोलत नाहीत. फक्त पदाचा गैरवापर करुन त्या काम करत आहेत. खासदारांनी अमेठीच्या नागरिकांच्या प्रगतीविषयी बोलावं, त्यांच्या चांगुलपणाविषयी बोलावं, भेदभावाचं राजकारण करू नये," असं रॉबर्ट वाड्रा यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. No Clean Chit To Robert Vadra : जमीन व्यवहारात रॉबर्ट वाड्रा यांना क्लीन चिट नाही, हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांतर्फे खुलासा
  2. Robert Vadra Money Laundering Case: रॉबर्ट वाड्रांवर अटकेची टांगती तलवार.. १५ दिवसांसाठी अटकेपासून दिलासा
  3. राम मंदिर निर्माण निधीबाबत रॉबर्ट वाड्रा म्हणाले, 'मी सेक्युलर'

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.