नवी दिल्ली Padma Awards 2024 : माजी उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू (Venkaiah Naidu), सुलभ इंटरनॅशनलचे संस्थापक बिंदेश्वर पाठक आणि इतर अनेक प्रमुख व्यक्तींना सोमवारी राष्ट्रपती भवनात आयोजित समारंभात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या हस्ते पद्म पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं. प्रसिद्ध भरतनाट्यम नृत्यांगना पद्मा सुब्रमण्यम यांना पद्मविभूषणनं सन्मानित करण्यात आलं.
पद्मभूषण पुरस्कार : अभिनेते मिथुन चक्रवर्ती, गायक उषा उथुप, उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक आणि उद्योगपती सीताराम जिंदाल यांना पद्मभूषण पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या सोहळ्याला उपराष्ट्रपती जगदीप धनखर, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आदी उपस्थित होते.
देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान : पद्म पुरस्कार हा देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहे. पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या तीन श्रेणींमध्ये पुरस्कार दिला जातो. कला, सामाजिक कार्य, सार्वजनिक घडामोडी, विज्ञान आणि तंत्रज्ञान, व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा, नागरी सेवा इत्यादींसारख्या विविध विषयांवर किंवा क्रियाकलापांच्या क्षेत्रात पुरस्कार दिले जातात. अपवादात्मक आणि विशिष्ट सेवेसाठी पद्मविभूषण, उच्च दर्जाच्या विशिष्ट सेवेसाठी पद्मभूषण आणि कोणत्याही क्षेत्रातील विशिष्ट सेवेसाठी पद्मश्री पुरस्कार दिला जातो.
हेही वाचा -
- यंदाचा 'लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार' जाहीर; अमिताभ बच्चन ठरले पुरस्काराचे मानकरी - Lata Mangeshkar Award
- पृथ्वीराज सुकुमारन स्टारर 'द गोट लाईफ' ऑस्कर पुरस्कार मिळवू शकेल, इस्त्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांना विश्वास - Prithviraj Sukumaran
- पंतप्रधान मोदी भूतानच्या सर्वोच्च नागरी सन्मान 'ऑर्डर ऑफ द ड्रुक ग्याल्पो' पुरस्कारानं सन्मानित - PM Modi Civilian Honour