ETV Bharat / bharat

माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पी.व्ही. नरसिंह राव यांच्यासह चौघांना 'भारतरत्न' प्रदान; अडवाणींचा घरी जाऊन करणार सन्मान - Bharat Ratna Award

Bharat Ratna Awards : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज चार व्यक्तींना 'भारतरत्न' देऊन सन्मानित केलं. यात माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर आणि इतरांचा समावेश आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते अडवाणींना रविवारी 'भारतरत्न' देण्यात येणार आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 1:19 PM IST

Updated : Mar 30, 2024, 1:46 PM IST

नवी दिल्ली Bharat Ratna Awards : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात आयोजित एका कार्यक्रमात देशातील चार व्यक्तींना सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' देऊन सन्मानित केलंय. यात माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह, पी.व्ही. नरसिंह राव, कृषी शास्त्रज्ञ डॉ एमएस स्वामीनाथन आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांचा समावेश आहे.

अडवाणींचा घरी जाऊन करणार सन्मान : भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनाही 'भारतरत्ना'ने सन्मानित करण्यात येणार होतं. मात्र, आज ते राष्ट्रपती भवनात हजर राहिले नसून, 31 मार्च रोजी राष्ट्रपती त्यांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करणार आहेत. अडवाणी वगळता इतर चारही व्यक्तींना मरणोत्तर 'भारतरत्न' देण्यात आला. त्यांच्या कुटुंबीयांनी राष्ट्रपतींकडून हा सन्मान स्विकारला.

कोणी स्विकारला 'भारतरत्न' : माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचा 'भारतरत्न' पुरस्कार त्यांचा मुलगा पी व्ही प्रभाकर राव यांनी स्विकारला. तसंच कृषी शास्त्रज्ञ एम एस स्वामिनाथन यांचा 'भारतरत्न' पुरस्कार त्यांच्या कन्या डॉ. नित्या राव यांनी स्विकारला. तर कर्पूरी ठाकूर यांचा 'भारतरत्न' पुरस्कार त्यांचा मुलगा रामनाथ ठाकूर यांनी स्विकारला. माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा 'भारतरत्न' पुरस्कार त्यांचे नातू जयंत चौधरी यांनी स्विकारला.

आतापर्यंत किती जणांना सर्वोच्च पुरस्कार : केंद्रानं यंदा 5 व्यक्तींना 'भारतरत्न' पुरस्कार देण्याची घोषणा केली होती. मदन मोहन मालवीय, अटलबिहारी वाजपेयी, प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर मोदींच्या कार्यकाळात हा सन्मान मिळाला होता. 2024 मधील 5 जण मिळून आतापर्यंत हा सन्मान मिळविणाऱ्यांची संख्या 53 होईल.

का मिळाला 'भारतरत्न' : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कर्पूरी ठाकूर यांना त्यांच्या 100 व्या जयंतीच्या एक दिवस आधी म्हणजेच 23 जानेवारी रोजी 'भारतरत्न' देण्याची घोषणा केली होती. कर्पूरी ठाकूर हे दोनदा बिहारचे मुख्यमंत्री आणि एकदा उपमुख्यमंत्री होते. मागासवर्गीयांच्या समस्या सोडवण्यासाठी ते ओळखले जातात. त्याचप्रमाणे 9 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदींनी डॉ. एम एस स्वामीनाथन, माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव आणि चौधरी चरण सिंह यांना 'भारतरत्न' (मरणोत्तर) देण्याची घोषणा केली होती. स्वामीनाथन हे कृषी शास्त्रज्ञ होते. त्यांना भारतातील हरित क्रांतीचं जनक म्हटलं जातं. नरसिंह राव हे देशाचे 9 वे पंतप्रधान होते. तर चरणसिंग हे भारताचे पाचवे पंतप्रधान होते. ते उत्तर प्रदेशचे 5 वे मुख्यमंत्री देखील होते. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आणि कल्याणासाठी समर्पित केलं होतं.

हेही वाचा :

  1. एका पाकिस्तानी व्यक्तीलाही मिळालाय 'भारतरत्न' पुरस्कार, जाणून घ्या Bharat Ratna शी संबंधित रंजक गोष्टी
  2. 17 दिवसांत 5 जणांचा सन्मान, आता 'भारतरत्न'चंही राजकीयकरण होतंय का?
  3. एकाचवेळी तिघांना भारतरत्न; नरसिंह राव, चौधरी चरण सिंह आणि एमएस स्वामीनाथन यांना देशाचा सर्वोच्च सन्मान

Last Updated : Mar 30, 2024, 1:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.