ETV Bharat / bharat

भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा आज स्मृतीदिन ; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान मोदींनी वाहिली आदरांजली - Atal Bihari Vajpayee

Atal Bihari Vajpayee Death Anniversary : माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यांच्या स्मृतीदिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सदैव अटल' या त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली.

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 16, 2024, 9:34 AM IST

Updated : Aug 16, 2024, 10:06 AM IST

Atal Bihari Vajpayee Death Anniversary
माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी (ETV Bharat)

नवी दिल्ली Atal Bihari Vajpayee Death Anniversary : भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त आदरांजली वाहिली. भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचा आज सहावा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'सदैव अटल' या त्यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन आदरांजली वाहिली. तर देशभरातील अनेक दिग्गज नेत्यांनी सोशल माध्यमातून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांना त्यांच्या स्मृती दिनानिमित्त आदरांजली वाहिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली आदरांजली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सदैव अटल या माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन त्यांना आदरांजली वाहिली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल माध्यमांवर एक पोस्ट केली. यावेळी त्यांनी "अटल बिहारी वाजपेयी यांनी राष्ट्र उभारणीत अतुलनीय योगदान दिलं आहे. राष्ट्र उभारणीत दिलेल्या अतुलनीय योगदानासाठी अटल बिहारी वाजपेयी यांचं देशातील नागरिक स्मरण करतात. त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या देशातील नागरिकांना चांगल्या दर्जाचं जीवन जगता यावं, यासाठी समर्पित केलं. भारताच्या विकासाचं त्यांचं व्हिजन पूर्ण करण्यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहू," असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये शेयर केलं.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वाहिली आदरांजली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सकाळी सदैव अटल या माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या स्मृतीस्थळावर भेट दिली. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली. याबाबत त्यांनी आपल्या सोशल माध्यमांवर माहिती दिली आहे.

काय म्हणाले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना आदरांजली वाहिली. यावेळी नितीन गडकरी यांनी "माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी हे देशातील करोडो नागरिकांसाठी एक प्रेरणास्त्रोत आहेत. एक कुशल संघटक म्हणून अटल बिहारी वाजपेयी यांचं जीवन विचारधारा आणि तत्वांवर आधारित होतं. अटल बिहारी वाजपेयी यांनी आपलं सारं आयुष्य राष्ट्राला समर्पित केलं. त्यांच्या स्मृतीदिनी त्यांना कोटी कोटी प्रणाम," असं त्यांनी आपल्या सोशल माध्यमातील पोस्टमध्ये नमूद केलं आहे.

हेही वाचा :

  1. Bharat Jodo Yatra : वाजपेयींच्या स्मारकाला राहुलची भेट, भाजपसोबतची कटुता कमी होणार?
  2. भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांचा पुतळा लावण्यास शिंदे भाजप सरकारने दिली परवानगी
  3. Main Atal Hoon : 'मैं अटल हूं' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण; पंकज त्रिपाठीने शेअर केला अनुभव...

Last Updated : Aug 16, 2024, 10:06 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.