हसन (कर्नाटक) Suraj Revanna Sexual Assault Case : कर्नाटकमधील सेक्स स्कँडलमध्ये सहभागी असलेल्या प्रज्वल रेवन्नाचा भाऊ सूरज रेवन्ना याला हसन पोलिसांनी अटक केलीय. सूरजवर एका जेडीएस कार्यकर्त्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे. या प्रकरणी शनिवारी (22 जून) सूरज रेवन्नावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली.
काय आहे प्रकरण? : जेडीएसच्या एका कार्यकर्त्यानं पोलिसांत तक्रार दाखल केली होती की, होलेनरासीपुराचे आमदार एच.डी. रेवन्ना यांचा मोठा मुलगा सूरज रेवन्ना (वय 37) यानं 16 जून रोजी सायंकाळी होलेनरासीपुरा तालुक्यातील घनिकाडा येथील त्यांच्या फार्महाऊसवर त्याच्यावर लैंगिक अत्याचार केला. मात्र, सूरज रेवन्नानं हे सर्व आरोप फेटाळून लावले. त्यानं सांगितलं की, एका व्यक्तीनं त्याच्याकडून 5 कोटी रुपये उकळण्यासाठी खोटी तक्रार दाखल केली. तसंच या संदर्भात सुरज रेवन्ना यांचा जवळचा सहकारी शिवकुमार याच्या तक्रारीवरून पोलिसांनी एकाविरुद्ध खंडणीचा गुन्हा दाखल केला.
शिवकुमार यांनी आरोप केला की, सूरज रेवन्ना यांना लैंगिक अत्याचाराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न करत होता. एकानं सूरज रेवन्ना यांच्याकडं सुरुवातीला 5 कोटी आणि नंतर 2 कोटी रुपयांची मागणी केली. सुरज रेवन्ना हसन हा माजी खासदार प्रज्वल रेवन्नाचा मोठा भाऊ आहे. प्रज्वल रेवन्ना महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिस कोठडीत आहे. हसन लोकसभा मतदारसंघातून पराभूत झालेल्या प्रज्वलला 31 मे रोजी जर्मनीहून परत आल्यानंतर अटक करण्यात आली होती.
हेही वाचा -
- लैंगिक शोषण प्रकरणात प्रज्वल रेवन्नाची पौरुषत्व क्षमता चाचणी, आज पुन्हा न्यायालयात करणार हजर - Prajwal Revanna Case
- सेक्स स्कँडलमधील आरोपी जेडीएस उमेदवार प्रज्वल रेवन्ना याचा दारुण पराभव - Lok Sabha election results 2024
- लैंगिक शोषण प्रकरण : प्रज्वल रेवन्ना देशात येताच अटक; 6 जूनपर्यंत पोलीस कोठडी - Sexual Abuse Case