ETV Bharat / bharat

संभल हिंसाचार प्रकरण : पोलिसांनी आणखी चार हल्लेखोरांना ठोकल्या बेड्या, आरोपींची संख्या पोहोचली 39 वर - SAMBHAL VIOLENCE

संभल इथं झालेल्या हिंसाचारात चार आरोपींना अटक करण्यात आलं आहे. आतापर्यंत संभल हिंसाचारात पकडण्यात आलेल्या आरोपींची संख्या 39 झाली आहे.

Sambhal Violence
पकडण्यात आलेले आरोपी (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 10, 2024, 10:39 AM IST

लखनऊ : उत्तर प्रदेशमधील संभल इथं झालेल्या हिंसाचारात पोलिसांनी आणखी चार हल्लेखोरांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे आता संभल हिंसाचार प्रकरणात पकडण्यात आलेल्या हल्लेखोरांची संख्या 39 झाली आहे. 24 नोव्हेंबर इथं धार्मिक स्थळाच्या सर्वेक्षणासाठी गेलेल्या पथकावर जमावानं दगडफेक केली होती. यावेळी झालेल्या जाळपोळ आणि दगडफेकीनंतर गोळीबाराची घटना घडली. त्यामुळे पोलिसांनी तब्बल 2750 अज्ञात हल्लेखोरांवर गुन्हा दाखल केला आहे.

संभल हिंसाचारातील आणखी चार आरोपींना अटक : संभल हिंसाचारातील हल्लेखोरांना पकडण्यासाठी पोलिसांनी कारवाई सुरू केली. पोलिसांनी संभल हिंसाचारातील आणखी चार आरोपींना अटक केली आहे. आतापर्यंत पोलिसांनी एकूण 39 नराधमांना अटक करून तुरुंगात टाकलं आहे. पोलीस आणखी हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. पोलीस आरोपींचा कसून तपास करत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांची ओळख पटवून पोलिसांनी अटकेची कारवाई सुरू केली. या तपासात पोलिसांनी अनस, सुफियान, तनवीर आणि शरीक या आणखी चार हल्लेखोरांना अटक केलं आहे.

संभल हिंसाचार प्रकरण : पोलिसांनी आणखी चार हल्लेखोरांना ठोकल्या बेड्या (Reporter)

सर्वेक्षणादरम्यान हिंसाचार : संभल इथं 24 नोव्हेंबर रोजी धार्मिक स्थळाच्या सर्वेक्षण करण्यासाठी पथक गेलं होतं. यावेळी हल्लेखोरांनी मोठा गोंधळ घातला. हल्लेखोरांनी दगडफेक करत जाळपोळ केली. नराधमांनी जाळपोळ केल्यानंतर परिसरात गोळीबार झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली. संभल हिंसाचारात चार जणांचा मृत्यू झाला असूनर 29 पोलीस जखमी झाले. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणी सपा खासदार झियाउर रहमान बुर्के आणि आमदार इक्बाल महमूद यांचा मुलगा सुहेल इक्बाल यांच्यासह 6 जणांविरुद्ध वेगवेगळ्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. त्याशिवाय पोलिसांनी 2750 अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार विश्नोई यांनी सांगितलं की, "आतापर्यंत एकूण 39 आरोपींना अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलं आहे. अन्य आरोपींची ओळख पटवली जात आहे. संभल हिंसाचारात सहभागी असलेल्या हल्लेखोरांना सोडलं जाणार नाही."

हेही वाचा :

  1. गाझीपूर सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन; राहुल गांधी, प्रियंका गांधींचा ताफा पोलिसांनी अडवला
  2. Love Jihad : उत्तर प्रदेशात लव्ह जिहाद प्रकरणी महाराष्ट्रातील तरुणाला अटक, शेजारी म्हणतात मुले चांगली होती

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.