रामनाथपुरम् (तामिळनाडू) PM Narendra Modi in Tamilnadu : अयोध्येत 22 जानेवारीला होणारा रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा संपूर्ण देशात साजरा होतोय. या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. यासाठी ते काटेकोरपणे पालनही करत आहेत. याआधी ते दक्षिण भारतातील मंदिरांना भेट देऊन प्रार्थना करत आहेत. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी आज 'रामसेतू'च्या मूळ ठिकाणी भेट देणार आहेत.
- सकाळी 'रामसेतू'च्या जागी देणार भेट : पंतप्रधान मोदी आज सकाळी 9.30 वाजता अरिचल मुनई पॉईंटला भेट देतील. या ठिकाणी 'रामसेतू' बांधला होता असं म्हटलं जातं. यानंतर ते सकाळी 10.15 वाजता श्री कोठंडाराम स्वामी मंदिरात पूजा करुन दर्शन घेतील. कोठंडाराम नावाचा अर्थ धनुष्य असलेला राम आहे. हे ठिकाण धनुषकोडी इथं आहे.
-
ஸ்ரீ ரங்கநாதசுவாமி கோவிலில் கம்ப ராமாயண பாராயணத்தை கேட்டது என் வாழ்நாள் முழுவதும் நான் மறக்க இயலாத அனுபவம். ஒப்பற்ற கம்பன் தாம் இயற்றிய ராமாயணத்தை முதன்முதலில் பொதுவெளியில் அரங்கேற்றியது இந்த கோவிலில்தான் என்பது குறிப்பிடத்தக்கது. pic.twitter.com/cEja73CQ9g
— Narendra Modi (@narendramodi) January 20, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">ஸ்ரீ ரங்கநாதசுவாமி கோவிலில் கம்ப ராமாயண பாராயணத்தை கேட்டது என் வாழ்நாள் முழுவதும் நான் மறக்க இயலாத அனுபவம். ஒப்பற்ற கம்பன் தாம் இயற்றிய ராமாயணத்தை முதன்முதலில் பொதுவெளியில் அரங்கேற்றியது இந்த கோவிலில்தான் என்பது குறிப்பிடத்தக்கது. pic.twitter.com/cEja73CQ9g
— Narendra Modi (@narendramodi) January 20, 2024ஸ்ரீ ரங்கநாதசுவாமி கோவிலில் கம்ப ராமாயண பாராயணத்தை கேட்டது என் வாழ்நாள் முழுவதும் நான் மறக்க இயலாத அனுபவம். ஒப்பற்ற கம்பன் தாம் இயற்றிய ராமாயணத்தை முதன்முதலில் பொதுவெளியில் அரங்கேற்றியது இந்த கோவிலில்தான் என்பது குறிப்பிடத்தக்கது. pic.twitter.com/cEja73CQ9g
— Narendra Modi (@narendramodi) January 20, 2024
काय आहे या जागेचं महत्त्व? : धनुषकोडी बद्दल असं म्हटलं जातं की इथंच बिभीषणानं श्रीरामांची पहिल्यांदा भेट घेतली. त्यांच्याकडं आश्रय मागितला. तसंच जिथं श्रीरामांनी विभीषणाचा राज्याभिषेक केला होता, हे तेच ठिकाण असल्याचाही काही आख्यायिकांमध्ये उल्लेख आहे. शनिवारी पंतप्रधान मोदींनी भगवान रामनाथस्वामी मंदिरात प्रार्थना केली. तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यातील रामेश्वरम बेटावर असलेल्या शिव मंदिराचा रामायणाशी संबंध आहे. कारण या ठिकाणी असलेल्या शिवलिंगाची स्थापना भगवान श्रीरामांनी केली होती. यानंतर श्रीरामांनी इथं माता सीतेसोबत प्रार्थना केली होती, असं म्हटलं जातं. रंगनाथनस्वामी मंदिराला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत.
पंतप्रधान मोदींनी घातली होती रुद्राक्षाची माळ : पंतप्रधान मोदी यांनी शनिवारी 'अग्नी तीर्थ' तीरावर स्नान केल्यानंतर भगवान रामनाथस्वामी मंदिरात पूजा केली होती. रुद्राक्ष जपमाळ परिधान केलेल्या पंतप्रधान मोदींनी तामिळनाडूतील रामनाथस्वामी या प्राचीन शिव मंदिरात पूजा केली होती. यासोबतच त्यांनी मंदिर परिसरातील २२ विहिरींमध्ये स्नान केलं होतं. भाविक याठिकाणी स्नान करणे शुभ आणि धार्मिक मानतात. मंदिर संकुलातील 22 विहिरी नैसर्गिक झऱ्यांचा संदर्भ देतात. त्यांपैकी प्रत्येकाला तमिळमध्ये 'नाझी किनरु' (विहीर) म्हणून ओळखलं जातं. यावेळी पुरोहितांनी मोदींचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं होतं.
हेही वाचा :