लखनऊ 4 Vande Bharat Trains To UP : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तरप्रदेशला चार नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांसह पाच जन औषधी केंद्रांची भेट देणार आहेत. त्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विविध विकास कामांचं लोकार्पण करणार आहेत. यात 85 कोटी रुपयांपेक्षा अधिकचे रेल्वे प्रकल्पाची कामं आहेत. तर 147 एक स्टेशन एक उत्पादन केंद्राचा प्रकल्पाचंही लोकार्पण करण्यात येणार आहे.
या प्रकल्पाची उत्तरप्रदेशला मिळणार भेट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लखनऊ विभागात नवीन प्रकल्पांमध्ये 10 चांगले शेड, गतीशक्ती कार्गो टर्मिनल, 22 एक स्टेशन एक उत्पादन प्रकल्प, दोन रेल्वे कोच रेस्टॉरंट, अकबरपूर बाराबंकी रेल्वे विबागाचं दुहेरीकरण, जौनपूर अकबरपूर रेल्वे विभागाचं दुहेरीकरण, अन्नपूर कटनी तिसरा रेल्वे मार्ग आदी योजनांचा समावेश आहे. त्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी युनिव्हर्सल कोचिंग मेंटेनन्स फॅसिलिटीच्या बांधकामांची पायाभरणी करणार आहेत. त्यासह लखनऊ ते पाटणा या वंदे भारत रेल्वेला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
मुरादाबाद विभागात या प्रकल्पांचं होणार लोकार्पण : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुरादाबाद विभागातील मोदी गतिशक्ती कार्गो टर्मिनल, जनऔषधी, रोजा सीतापूर बुर्हवाल रेल्वेचं दुहेरीकर, सहा मालवाहतूक गोदामं, 23 एक स्टेशन एक उत्पादन आणि सात डीएफसी प्रकल्पाचं उद्घाटन करण्यात येणार आहे. डेहराडून ते लखनऊ नवीन वंदे भारत रेल्वे एक्सप्रेसला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे हिरवा झेंडा दाखवणार आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तरप्रदेशात विविध प्रकल्पांचं लोकार्पण करणार आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 नवीन वंदे भारतला हिरवा झेंडा दाखवणार आहेत. त्यासह सध्याच्या सुरु असलेल्या चार वंदे भारत रेल्वेचा प्रवास वाढवला जाणार आहे. दोन नवीन पॅसेंजर गाड्या सुरू करणार आहेत. त्यासह सात नवीन मालवाहू गाड्यांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्गाटन करणार आहेत. यामध्ये उत्तर रेल्वेला तब्बल चार वंदे भारत एक्सप्रेस गाड्या मिळणार आहेत.
या वंदे भारत रेल्वे एक्सप्रेसची मिळणार भेट :
- पाटणा - लखनऊ वंदे भारत एक्सप्रेस
- लखनऊ - देहराडून वंदे भारत एक्सप्रेस
- रांची - वाराणसी वंदे भारत एक्सप्रेस
- दिल्ली - खजुराहो वंदे भारत एक्सप्रेस
हेही वाचा :