नवी दिल्ली Kargil Vijay Diwas : कारगिल विजय दिवसाच्या (Kargil Vijay Diwas) 25 व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) 26 जुलै रोजी लडाखच्या द्रासला भेट देणार आहेत. तत्पूर्वी, लडाखचे नायब राज्यपाल बी डी मिश्रा यांनी रविवारी (21 जुलै) सचिवालयात बैठक घेतली. यावेळी त्यांनी द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकाला पंतप्रधानांच्या भेटीच्या व्यवस्थेचा आढावा घेतला.
The Hon’ble Lt Governor Brig (Dr) BD Mishra (Retd) held a meeting at the Lieutenant Governor’s Secretariat to discuss the arrangements for Hon'ble Prime Minister of India, Shri Narendra Modi’s visit to the Kargil War Memorial Drass.@PMOIndia pic.twitter.com/29juTpfrhK
— Office of the Lt. Governor, Ladakh (@lg_ladakh) July 21, 2024
कारगिल युद्ध स्मारकाची पाहणी : "नायब राज्यपाल बी डी मिश्रा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारगिल युद्ध स्मारक द्रास भेटीच्या व्यवस्थेबाबत चर्चा करण्यासाठी नायब राज्यपालाच्या सचिवालयात बैठक घेतली," अशी माहिती नायब राज्यपाल यांच्या कार्यालयाकडून एक्सवर पोस्ट करण्यात आलीय. यावेळी नायब राज्यपाल मिश्रा यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक ती सर्व व्यवस्था वेळेत पूर्ण करण्यास सांगितलं. तसंच पंतप्रधानांच्या भेटीच्या व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी 24 जुलै 2024 रोजी द्रास येथील कारगिल युद्ध स्मारकाला नायब राज्यपाल बी डी मिश्रा भेट देणार असल्याचंही सांगण्यात आलंय.
कारगिल विजय दिवसाचा इतिहास : 1999 मध्ये कारगिल युद्धात भारतानं पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाच्या स्मरणार्थ दरवर्षी 26 जुलैला कारगिल विजय दिवस (Kargil Vijay Diwas) साजरा केला जातो. युद्धादरम्यान, भारतीय सैन्यानं पाकिस्तानी घुसखोरांना हाकलून लावलं आणि 'ऑपरेशन विजय' (Operation Vijay) चा भाग म्हणून टायगर हिल आणि इतर सर्व चौक्यांवर कब्जा करण्यात भारतीय सैनिकांनी यश मिळवलं होतं. लडाखच्या कारगिलमध्ये 60 दिवसांहून अधिककाळ भारत विरुद्ध पाकिस्तान युद्ध सुरु राहिलं आणि शेवटी हे युद्ध भारतानं जिंकलं. दरवर्षी या दिवशी कारगील युद्धात हुतात्मा झालेल्या शेकडो भारतीय जवानांना श्रद्धांजली अर्पण केली जाते. भारतीय सशस्त्र दलाच्या योगदानाचं स्मरण करण्यासाठी दरवर्षी देशभरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.
हेही वाचा -