जयपूर Cyber Fraud In Jaipur : फोन पे कंपनीची 4 कोटी रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी राजधानी जयपूरच्या सायबर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केलीय. शनिवारी पोलिसांनी आरोपी मनराज मीना (रा. जगतपुरा, जयपूर) आणि लेखराज सेहरा (रा. मालवीय नगर) यांना अटक केली. दोन्ही आरोपी मूळचे जयपूर येथील दौसा हॉलचे रहिवासी आहेत. आरोपी फोनपे कंपनीचे कर्मचारी असल्याचं भासवून ग्राहकांची फसवणूक करायचे. आरोपींकडून 4 लाख रुपयांची रोकड, 6 मोबाईल फोन, 70 डेबिट कार्ड, दुकानाचे भाडेपत्र, पॅनकार्ड, आधार कार्ड आणि रबर स्टॅम्प जप्त करण्यात आले आहेत.
अतिरिक्त पोलीस आयुक्त कैलाश चंद बिश्नोई यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर क्राईम पोलीस ठाण्यात फोन पे कंपनीसोबत कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. फोन पे कंपनीचे कर्मचारी असल्याचं सांगून आरोपींनी अनेकांना लुटलं. पीओएस उपकरण वापरून डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्डद्वारे व्यापाऱ्यासोबत व्यवहार करण्यात आले. पूर्वनियोजित कटाचा एक भाग म्हणून अज्ञात ग्राहक आणि व्यापाऱ्याने POS यंत्राचा बेकायदेशीरपणे वापर करून सुमारे 4 कोटी रुपयांची फसवणूक केलीय. या प्रकरणाची गांभीर्यानं दखल घेत पोलीस उपायुक्त दिगंत आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आले. त्यानंतर दोन आरोपींना अटक करण्यात आलं. तर अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आलं असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहितीही बिश्नोई यांनी दिली.
अशाप्रकारे करत असत फसवणूक : पोलिसांच्या माहितीनुसार, फोन पे कंपनीची फसवणूक करण्यासाठी आरोपी खोटी माहिती देऊन PhonePe वर ऑनबोर्ड करायचे. त्यानंतर आरोपी पीओएस उपकरण वापरून क्रेडिट किंवा डेबिट कार्डद्वारे त्याच्या ग्राहकाकडून पेमेंट घेत असे. पेमेंट मिळाल्यानंतर ते व्यापाऱ्याच्या लिंक केलेल्या बँक खात्यात पेमेंट जमा करत असे. यानंतर ग्राहक क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड सर्विस प्रोवाइडर समोर खोट्या आधारावर चार्जबॅक दाखल करत होते.
चार्जबॅकचे नियम काय आहेत : कायद्यानुसार, व्यापाऱ्याद्वारे चार्जबॅक मंजूर केल्यानंतर, PhonePe ला स्वतःच्या निधीचा वापर करून यशस्वी चार्जबॅकसाठी ग्राहकाला पैसे परत करावे लागतात. त्यानंतर, PhonePe ती रक्कम व्यापाऱ्याकडून PhonePe द्वारे प्राप्त झालेल्या पुढील पेमेंटमधून वसूल करते. परंतु, चार्जबॅक यशस्वी झाल्यानंतर आरोपींनी PhonePe सोबत काम करणं थांबवले. अशा प्रकारे ग्राहकाला कोणतीही वस्तू किंवा सेवा न देता आरोपीला पूर्ण मोबदला मिळत असे.
हेही वाचा -
- सायबर गुन्हेगारांनो सावधान! क्लिष्ट सायबर गुन्ह्यांची चुटकीत होणार उकल, पोलीस करणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर - देवेंद्र फडणवीस - Devendra Fadnavis On Cyber Crime
- ICICI बँक मॅनेजर अडकला सायबर गुन्हेगाराच्या जाळ्यात, लाखोंचा लावला चुना - Bank Manager Cyber Crime
- विदेशात नोकरीच्या शोधात असाल तर सावधान! 65 हजार वेतन देऊन गुन्हे करायला लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश - Call Centre Fraud